Table of Contents
Research Articles
राणीमाशी: स्त्रीपुरुष संबंधांवर भाष्य
01 to 09
शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या वाङ्मयीन वाटचालीमध्ये तीन आत्मनिवेदनात्मक पुस्तके लिहिली.’अक्करमाशी’ (१९८४), ‘बारामाशी’ (१९८८), ‘राणीमाशी’ (१९९२) यांचा उल्लेख होतो. दाहक जीवनानुभवातून ‘अक्करमाशी’ ची निर्मिती झाली आहे. तर ‘बारामाशी’ या आत्मकथनात लिंबाळे ‘दलित ब्राह्मण’ म्हणून पांढरपेशा मध्यमवर्गीय मनाची कबुली देतात, तर ‘राणीमाशी’ या तिसऱ्या आत्मनिवेदनात्मक पुस्तकात ‘विवाह बाह्य स्त्रीपुरूष संबंधा’चे चित्रण आले आहे.
मराठी साहित्यामध्ये तीन वेगवेगळ्या विषयावरील आत्मकथने लिहिण्याची ही एक अपवादात्मक पध्दत आहे. मात्र शरणकुमार लिंबाळे यांनी अशा वेगवेगळ्या विषयावर ‘आत्मकथने’ लिहून मराठी आत्मकथनामध्ये मोलाची भर टाकली आहे.
गोमंतकीय मराठी संस्कृतीचा सतराव्या शतकातील युरोपीय ग्रंथकारांवर प्रभाव
10 to 19
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या गोमंतभूमीला परंपरेने सांस्कृतिक वैभवाचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा वारसा कालानुक्रमे वृद्धिंगत होत राहीला. येथील भूमी, निसर्ग, नदी, समुद्र यांना प्राधान्य देणारी गोमंतकीय संस्कृती या प्रदेशातील जनतेच्या जीवनप्रणालीत नैसर्गिकरित्या एकरूप झाली होती. गोव्यात सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी सत्ता प्राप्त करताच येथील जनतेचे ख्रिस्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्याला गोमंतकीय वीरांनी प्रखर विरोध केला. काहींचे बळजबरीने ख्रिस्तीकरणकरण्यात आले असले,तरी त्यांनी आपली संस्कृती सोडली नव्हती. अशा नवख्रिस्ती लोकांनी पोर्तुगीजांची युरोपीय संस्कृती स्वीकारावी आणि पूर्वीच्या हिंदू संस्कृतिप्रमाणे वागू नये, यासाठी पोर्तुगीजांनी अनेकविध प्रयत्न केले. शेवटी पोर्तुगीजांनीगोव्यात ‘Inquisition’ न्यायालयस्थापन केले. त्यात अपराध सिद्ध झाला, तर त्या अपराध्याला भयानक शिक्षा केल्या जात होत्या. तरीही गोमंतकीय नवख्रिस्ती जनता आपल्या पूर्वाश्रमीच्या संस्कृतीपासून प्ररावृत्त झाली नाही. त्याच्या मतपरिवर्तनासाठी युरोपातून गोव्यात आलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सतराव्या शतकात मराठी ग्रंथांची निर्मिती केली. त्यांच्या या ग्रंथांवर गोमंतकीय संस्कृतीचा, ग्रंथपरंपरेचा प्रभाव दिसून येतो. प्रस्तुत शोधनिबंधात फादर स्टीफन्स, फादर एतियनदला क्रूवा आणि फादर आंतोनियुदसालदांज या तीन युरोपीय ग्रंथकरांच्या रचनांचा प्रातिनिधिक परामर्श घेतला आहे.
मराठी विज्ञानकादंबरीतील तंत्रज्ञानाचे स्वरूप
20 to 28
मराठी विज्ञान कादंबरीतील तंत्रज्ञानाचे स्वरूप आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम तपासणे हे या लेखाचे उद्दिष्ट आहे. निरंजन घाटे यांची ‘कळसूत्री’ (अणुबॉम्ब तंत्रज्ञान, स्क्रॅबलर), जयंत नारळीकर यांची ‘प्रेषित’ (सायक्लॉप्स दुर्बीण, अंतराळ स्थानके, एअरकार), आणि लक्ष्मण लोंढे यांची ‘देवासिं जिवें मारिले’ (ऑपरेशन ब्लू अर्थ) यांसारख्या विज्ञान कादंबऱ्यांमधील वैज्ञानिक कल्पितांचे विश्लेषण यात केले आहे. माधुरी शानभाग यांच्या ‘ब्रेनवेव्ह्ज’ (वेव्ह्ज मेकॅनिक्य) आणि शुभदा गोगटे यांच्या ‘यंत्रायणी’ (कृत्रिम मानवी निर्मिती) मधील तंत्रज्ञानाचाही मागोवा घेण्यात आला आहे. बहुतेक मराठी विज्ञान कादंबऱ्या वास्तव विज्ञानाच्या भक्कम पुराव्यांवर आधारित आहेत, परंतु काही अपवादात्मक कादंबऱ्यांमध्ये भविष्यातील कल्पित अतिदूरचे वास्तव असू शकते, असा निष्कर्ष काढला आहे.
मराठी कवितेत उमटलेले जागतिकीकरणाचे प्रतिबिंब
29 to 37
साहित्य हा समाजमनाचा आरसा असतो, हे आपण वारंवार ऐकत आलो आहोत. समाजात घडणाऱ्या सर्व बऱ्यावाईट घटनांचे पडसाद साहित्यात उमटतात. सभोवताली घडणारे बदल साहित्यावर प्रभाव टाकतात. जागतिकीकरण ही माणसाच्या जगण्यात आणि विचारात अमूलाग्र बदल घडवणारी घटना आहे. मानवी आयुष्याला जागतिकीकरणाने व्यापले आहे. प्रत्येक क्षेत्रात जागतिकीकरणाचा शिरकाव झाला आहे. शांत, संयमी आणि समाधानी आयुष्य जगणाऱ्या सर्वसामान्य कष्टकरी माणसाचे जीवन जागतिकीकरणाने ढवळून निघाले. त्याच्या क्षमतेबाहेरची, आकलनाबाहेरची आणि जगण्याबाहेरची ही गोष्ट त्याला अपरिहार्यता म्हणून स्वीकारावी लागली. तर शहरी माणसाने गरज म्हणून ती स्वीकारली. जागतिकीकरणाचा झगमगाट हा वरवरचा भुलभुलय्या आहे, हे कळण्यासाठी काही वर्षे जावी लागली. आज मात्र जागतिकीकरणाचे घातक परिणाम ठळक होऊ लागले आहेत. गावखेडी, शेतीमाती, उद्योगधंदे, कला, साहित्य, राजकारण आणि समाजकारण अशी सर्वच क्षेत्रे जागतिकीकरणाने प्रभावित झाली आहेत. सुखाच्या संकल्पना बदलल्या आहेत. जीवनमूल्ये बदललेली आहेत. समूहभान नष्ट होऊन आत्मकेंद्री, चंगळवादी वृत्ती फोफावली आहे. याचा परिणाम म्हणून आयुष्यातील आनंदच हरवला आहे. जगण्याच्या या पडझडीचे प्रतिबिंब मराठी कवितेत ठळकपणे पडलेले दिसते.
‘राजधर्म’ राजकीय अधर्माच्या संस्कृतीचे चित्रण
38 to 46
माणूस आणि राजकारण यांचे नाते पुरातन काळापासूनचे आहे. इतरांशी वागण्याबोलण्याची, वर्तनव्यवहाराची प्रत्येक चाल ही एकप्रकारचे राजकारण असते. राजकारणाच्या दोन बाजू असतात. विवेकनिष्ठ, मूल्ययुक्त राजकारण आणि विवेकाला तिलांजली देऊन अविवेकाला खुलेआम शरण गेलेले मूल्यहऱ्हासी राजकारण. आजकाल केवळ देशपातळीवरच नव्हे; तर जागतिक पातळीवर अपवाद सोडला तर हे दुसऱ्या प्रकारचे राजकारण आपणास भगभगीतपणाने दिसते आहे. अशा राजकारणापासून सर्वसामान्य माणसाने कितीही अंतर राखून राहतो असे म्हटले तर ते केवळ अशक्य असते. पर्यायच नाही अशी गत करून ठेवली आहे; या वर्तमानकालीन राजकारणाने. या अर्थाने पाहू जाता राजकारण हे समाजजीवनातील एक अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. राजकारणाची सावली आपण कितीही म्हटले तरी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यावर पडल्याशिवाय राहात नाही. अशा सुष्ठ आणि दुष्ठ राजकारणाचे चित्रण वैचारिक आणि ललित साहित्यातही उमटत असते. अर्थातच ते अल्प अशा स्वरूपाचे आहे. मराठी साहित्यात राजकारणाचे प्रतिबिंब अल्पांशाने पडले आहे, हे मान्यच करावे लागते. राजकारणाची पार्श्वभूमी, राजकारणसमाजकारणाचे आकलन लेखकाजवळ असेल तर त्याच्या साहित्यकृतीत राजकारणाचे यथायोग्य चित्रण येऊ शकते, असे म्हणता येते. त्या अल्पामध्ये उल्लेख करता येईल अशी डॉ. विनोद गायकवाड यांची ‘राजधर्म’ ही कादंबरी आहे. ‘सत्तासंघर्ष’ आणि ‘मूल्यसंघर्ष’ यांच्यातील ताणाचे चित्रण वास्तवाशी समांतरपणे जात ही कादंबरी करते.
मराठी साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान
47 to 53
साहित्य आणि संस्कृती यांचा परस्परांशी जवळचा संबंध दिसून येतो. सांस्कृतिक संदर्भातून साहित्य निर्माण होत असते. त्यामुळे साहित्य आणि संस्कृती यांचे दुहेरी नाते दिसून येते. भोवतालचे जग, अनुभव साहित्यिक आपल्या लेखणीतून मांडत असतो. समाजातील प्रथा, रूढी, परंपरा, रितीरिवाज या सर्व घटकांचा समावेश संस्कृतीमध्ये होत असतो. हे सर्व सांस्कृतिक संदर्भ साहित्यातून व्यक्त होत असतात. म्हणूनच संस्कृती ही साहित्याची सामग्री मानली जाते. तर भाषा हे संस्कृतीचे वाहन मानले जाते.
मराठी साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाफ साहित्य निर्मिती, प्रसार आणि वाचकांशी जोडणी यांसारख्या क्षेत्रांमध्ये होत आहे. तंत्रज्ञानामुळे साहित्यक्षेत्रात मदत झालेली दिसून येते. ऑनलाईन पुस्तकांची उपलब्धता, डिजिटल वाचनालये, सोशल मिडीयावरील साहित्य प्रसार शक्य झाला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन साहित्य जसे की डिजिटल कथा तयार होत आहेत.प्रसारमाध्यमांच्याद्वारे विविध भाषांतील मजकूर भाषांतरित होऊन वाचक, श्रोत्यांपर्यंत पोहोचत असतो.भाषा, साहित्य, संस्कृती आणि अनुवादात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो.
माहिती तंत्रज्ञान म्हणजे योग्य अशी माहिती इंटरनेटच्या माध्यमाने सर्वत्र पोहोचविणे होय. मानवाने आपल्या अभिव्यक्तीसाठी भाषेमागचे तंत्रज्ञान सतत विकसित केले आहे. आजपर्यंत आपल्या मराठीचा विकास होत आलेला आहे. तंत्रज्ञानाने तर भाषा अधिकाधिक तीव्र गतीने बदलत जाते. परंतु आज माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर टाळणे शक्य होत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाचा व त्याबरोबर बदलत्या भाषेचा स्वीकार आपल्याला करावाच लागतो. संगणक, मोबाईल, इंटरनेट यासारख्या माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमांमध्ये इंग्रजीचा वापर मोठया प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे आपल्या मराठी भाषेतही इंग्रजी शब्दांचा वापर रोजच्या व्यवहारात होताना दिसतो. उदा. ‘तू मला लगेच SMSकर’, ‘मी तुला email पाठवतो’ इ. यासारखे अनेक इंग्रजी शब्द हे मराठी भाषेत सर्रास वापरले जातात. म्हणजेच तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच मराठी भाषाही बदलत गेली हे आपल्याला मान्य करावे लागते. तसेच काही कर्मवाचक इंग्रजी शब्द मराठी क्रियापदांबरोबर वाक्यात सहजपणे वापरले जातात. उदा. ‘सिरियल लागली का?’, ‘पीडीएफ करून पाठव’ या वाक्यांमध्ये कर्मवाचक शब्द हे इंग्रजी आहेत पण मराठी वाक्यांत ते सहजतेने वापरले जातात. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाची माध्यमे वाढत गेली आणि त्यातून अनेक नवीन शब्दांची भर आपल्या भाषेत पडत गेली.
दलित साहित्य प्रवाहातील संस्कृती दर्शन: उर्मिला पवार यांच्या ‘हातचा १’ या कथासंग्रहाच्या अनुषंगाने
54 to 63
साहित्य हा समाजाचा आरसा मानला जातो. प्रत्येक साहित्यामध्ये त्या काळातील संस्कृतीचे दर्शन घडत असते. दलित साहित्य प्रवाहात अस्पृश्यतेविरुद्धचा लढा, समतेचा शोध, सामाजिक न्यायाची आकांक्षा आणि नव्या संकृतीचे दर्शन, त्याकाळातील संस्कृतीची मूल्यव्यवस्था, संघर्ष आणि बदल या सर्वांचा विचार येथे उर्मिला पवार यांच्या कथांच्या अनुषंगाने करण्यात आलेला आहे.
मुस्लिम मराठी साहित्य: चळवळ आणि दिशा
64 to 71
मराठी साहित्याच्या साठोत्तरी कालखंडामध्ये अनेक नववाङ्मयीन प्रवाह रुढ झाले आहेत, उदा. आदिवासी, स्त्रीवादी इ. या नवप्रवाहांनी मराठी साहित्याचे स्वरुप व्यापक केले आहे. समाजाच्या तळागाळातील माणूस साहित्यिक आणि साहित्याचा विषय झाला. साहित्य निर्मितीचे केंद्र महाराष्ट्रातील काही शहरातच पूर्वी होते. पण साठोत्तरी कालखंडात प्रत्येक गाव खोद्यामधून शिकलेला तरुण मोद्या प्रमाणात साहित्य निर्माण करु लागला. आपल्या जगण्यातले संघर्ष आणि आपली अस्मिता मोठ्या प्रमाणात तो मांडू लागला. विशिष्ट जातीच्या लोकांनी साहित्यातील मक्तेदारी संपुष्टात आणली. समाजातील प्रत्येक समुहगट साहित्याची निर्मिती करु लागला. प्रस्थापित मराठी सारस्वतांनी साहित्यात साधी त्यांची दखलही घेतली नव्हते, असा मुका उपेक्षित समाज बोलू व लिहू लागला हे खूप धाडसाचे काम म्हणायला पाहिजे.
इतर उपेक्षित व दुर्लक्षित समुह गदाप्रमाणेच महाराष्ट्रातील मुस्लिम समाजपण उपेक्षितच होता. मराठी भाषेच्या सुरुवातीच्या काळापासून मुस्लिमांनी मराठी भाषा व साहित्याची सेवा केली तरी त्यांच्या मराठी बोलण्या व लिहिण्यावर शंका घेतली जाऊ लागली. त्यांचे साहित्य नाकारले जाऊ लागले आणि त्यांची उपेक्षा करुन त्यांचे खच्चीकरण करण्यात येऊ लागले. त्याच परिणे मराठी साहित्यामध्ये खलपात्र म्हणूनच या समुह गठाचे चित्रण करण्यात येऊ लागले. मुस्लिमांचे नकारात्मक चित्रण करण्यात येऊ लागले. मुस्लिमांचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन कसे अडचणीत आणता येईल हे एवढेच मराठी सारस्वतकारांनी केले आहे. मध्ययुगीन मराठी साहित्यामध्ये ४९ मुस्लिम मराठी संतानी केलेल्या कार्याची नोंद व दखलही घेतली गेली नाही. म्हणून मुस्लिम मराठी साहित्याची चळवळ निर्माण झाली. वा चळवळीच्या अनुषंगाने संतांच्या साहित्य सेवेला उजागर करणे, आधुनिक मुस्लिम मराठी साहित्यिकांच्या साहित्याची चर्चा करणे आणि मुस्लिम समाजात निर्माण झालेल्या प्रश्नांची चिकित्सा करणे, महाराष्ट्रातला मुस्लिम मराठी भाषेवर प्रेम करतो, मराठीत साहित्य निर्माण करत आहे यासारख्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची मीमांसा मुस्लिम मराठी साहित्याच्या अनुषंगाने केली जात आहे.
मराठी साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान
72 to 80
मराठी साहित्य हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय जीवनाचे प्रतिबिंब आहे. मध्यकाळापासून (संतपंततंत) ते आधुनिक काळापर्यंत कथा, कादंबरी, काव्य, नाटक, चरित्रआत्मचरित्र, प्रवासवर्णन या ललित लेखनाचा समावेश होतो. यात पुन्हा मराठी वाङ्मयातील वेगवेगळे प्रवाह येतात. त्यात दलित, ग्रामीण,आदिवासी, स्त्रीवादी, ख्रिस्ती, मुस्लिम, भटक्या विमुक्तांचे साहित्य, जनसाहित्य, बालसाहित्य, विज्ञान, अनुवादित साहित्य, कामगार साहित्य आदींचा समावेश होतो. एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे साहित्यनिर्मिती, वाचन, प्रसार आणि अभिव्यक्तीच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. मराठी साहित्येतिहास समृद्ध असून त्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिकतेचे सुंदर चित्रण येते. तंत्रज्ञानाचा वेगाने झालेला विकास साहित्यविश्वालाही मोठ्या प्रमाणात प्रभावित करतो आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, ईपुस्तके, पॉडकास्ट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या साधनांमुळे साहित्याचा प्रसार आणि निर्मिती या दोन्ही पातळ्यांवर क्रांती घडली आहे. लेखक आता ब्लॉग, यूट्यूब चॅनेल्स व ऑडिओबुक्सद्वारे वाचकांशी थेट संवाद साधत आहेत. पारंपरिक छापील पुस्तकांसोबतच डिजिटल स्वरूपातील साहित्य अधिक सहज उपलब्ध होत आहे. तसेच, नवोदित लेखकांसाठीही लेखन व प्रसिद्धीचे दरवाजे खुले झाले आहेत. मराठी भाषा आणि साहित्याचे डिजिटायझेशन सुरू असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अनुवाद साधनांनी जागतिक पातळीवर पोहोचण्याची क्षमता वाढली आहे. तथापि, या तंत्रज्ञानाच्या वापरात साहित्यिक गुणवत्ता आणि मौलिकतेचे जतन काळाची गरज आहे. त्यामुळे मराठी साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधताना संतुलन राखणे आवश्यक आहे. या बदलांचा योग्य वापर केल्यास मराठी साहित्याला एक नवीन आयाम मिळू शकतो. या शोधनिबंधात आपण मराठी साहित्याच्या ऐतिहासिक प्रवासाचा आढावा घेऊन आधुनिक तंत्रज्ञानामुळे झालेल्या बदलांवर प्रकाश टाकला आहे.
ग्रामीण, दलित आणि आदिवासी मराठी साहित्य प्रवाहातील संस्कृतीदर्शन.
81 to 92
हा शोधनिबंध ग्रामीण, दलित आणि आदिवासी मराठी साहित्य प्रवाहातील संस्कृतीदर्शनाचे सखोल विश्लेषण करतो. मराठी साहित्य हे केवळ अभिजात वर्गाचे नसून, ते महाराष्ट्राच्या श्रमजीवी आणि वंचित समाजाचे प्रामाणिक प्रतिबिंब आहे. ग्रामीण साहित्यातून शेतकरी जीवनातील श्रम, लोककला, लोकपरंपरा आणि निसर्गाशी असलेले नाते स्पष्ट होते. दलित साहित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित स्वाभिमान, समता आणि सामाजिक संघर्षाची संस्कृती दर्शवते, जे अन्यायग्रस्त अनुभवातून उभी राहिली आहे. तर, आदिवासी साहित्य निसर्गकेंद्री जीवन, पारंपरिक लोकश्रद्धा आणि सामूहिकतेचे मूल्य अधोरेखित करते. हे तिन्ही प्रवाह एकत्र येऊन मराठी साहित्याला उपेक्षितांच्या सांस्कृतिक लोकशाहीची व्यापक आणि बहुरंगी ओळख देतात. तिन्ही प्रवाह मराठी साहित्याला सामाजिक वास्तवाचे भान देतात, हे या निबंधातून सिद्ध होते.
जागतिकीकरण आणि महानगरीय जीवनाचे मराठी कथेतील प्रतिबिंब
93 to 101
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दृढ झालेल्या जागतिकीकरणामुळे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनात अमूलाग्र बदल घडले. १९९१ नंतरच्या नव्या आर्थिक धोरणामुळे औद्योगिकीकरण, स्थलांतर आणि शहरीकरणाच्या प्रक्रियेत वेग आला व त्यातून ‘महानगर’ ही संकल्पना ठळकपणे पुढे आली. विविध प्रांतांतील, भाषिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या सहजीवनातून महानगरात मिश्रित संस्कृती आकारली. या नव्या शहरीऔद्योगिक वास्तवाने मराठी साहित्याकडेही लक्ष वेधले.
१९५०६० च्या ग्रामीण साहित्यकेंद्रित प्रवाहानंतर १९७०८० पासून मुंबई, पुणे यांसारख्या शहरांचे जीवनकेंद्री चित्रण सुरू झाले. १९९० नंतरच्या नव्वदोत्तर काळात जयंत पवार, समर खडस, सतीश तांबे, विजय तांबे, पंकज कुरुलकर, मनस्विनी लता रवींद्र, मेघना पेठे आदी लेखकलेखिकांनी महानगरीय जाणीवा कथालेखनातून प्रभावीपणे व्यक्त केल्या. संघर्ष, बेरोजगारी, स्त्रीचे अस्तित्वदर्शन, सामाजिकराजकीय अस्थिरता, तंत्रज्ञानाचा प्रभाव, नात्यांतील तुटकपणा ही केंद्रस्थाने त्यांच्या कथांमध्ये ठळकपणे येतात.
महानगरीय कथेची भाषा ही संमिश्र, प्रयोगशील व काळानुरूप बदलणारी आहे. स्थानिक बोली, स्थलांतरितांच्या भाषिक सवयी, हिंदीइंग्रजी शब्दप्रयोग तसेच माहितीतंत्रज्ञानाशी निगडित संज्ञा या भाषेत गुंफलेल्या आहेत. त्यामुळे महानगरीय कथा ही केवळ आशयदृष्ट्या नव्हे तर भाषिक पातळीवरही आधुनिक, वास्तवदर्शी व वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
मीना प्रभू यांच्या ‘मेक्सिको पर्व’ या प्रवासवर्णनाच्या पुस्तकातील खादयसंस्कृती
102 to 110
मराठी साहित्यात प्रवासवर्णन हा एक साहित्यप्रकार आहे. हा साहित्यप्रकारमध्ययुगीन कालखंडापासून मराठी साहित्यात अस्तित्वात आहे. मध्ययुगीन साहित्यातील महानुभाव, वारकरी साहित्य, बखर साहित्यात याचे पुरावे पाहण्यास मिळतात. आधुनिक कालखंडात हा साहित्यप्रकार एक महत्वाचा साहित्य प्रकार म्हणून ओळखला जातो. आधुनिक कालखंडात शामराव मोरोजी यांनी ‘काशीप्रकाश’ या नावाचे मराठीतील पहिले प्रवासवर्णन इ. स. १८५२ मध्ये लिहिले आहे. त्यानंतर गोडसे भटजी यांचे ‘माझा प्रवास’ लिहिले गेले आहे. त्यानंतर मराठी साहित्यात प्रवासवर्णन या साहित्यप्रकारची परंपरा अव्याहतपणे सुरु झाली आहे. अनंत काणेकर, गंगाधर गाडगीळ, पु. ल. देशपांडे, अण्णाभाऊ साठे यासारख्या अनेकांनी मराठीत प्रवासवर्णने लिहिली आहेत. जागतिकीकरणाच्या प्रारंभीच्या कालखंडात मीना प्रभू यांनी जगभर भटकंती केली आहे. त्यानंतर त्यांनी बारा प्रवासवर्णने लिहिली आहेत.
प्रवासवर्णन हा आत्मनिष्ठ स्वरूपाचा साहित्य प्रकार आहे. तो अनुभवनिष्ठ साहित्यप्रकार आहे. लेखकाने प्रवास केल्यानंतर त्यांचे लेखन केले जाते. म्हणून त्यास वस्तुनिष्ठ साहित्यप्रकार असे ही म्हटले जाते. साहित्यात जसे समाजाचे प्रतिबिंब पडते तसे प्रवासवर्णनामध्ये त्या त्या भागाच्या, देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडत असते. आधिभौतिक आणि भौतिक स्वरूपाची संस्कृती असते. असे संस्कृतीच्या अभ्यासकांनी मत मांडले आहे. संस्कृतीचा अभ्यास व्यापक स्वरूपाचा आहे. सर्वसाधारणपणे संस्कृतीचा अभ्यास करताना समाजातील प्रथा, परंपरा, सण, समारंभ, उत्सव, पोशाख, देव देवता, खाद्यसंस्कृती, आचार विचार, चाली रिती, वर्ग,वंश, लिंग, धर्म, विचारधारा, दंतकथा, श्रद्धा, अंधश्रद्धा, प्रतीके, प्रतिमा, मानवी मूल्ये, भाषा, स्थापत्य, कला यासारखी संस्कृतीची मूल्ये आहेत. ‘मेक्सिको पर्व’ या पुस्तकात संस्कृतीची अनेक मूल्ये अधोरेखित झाली आहेत. परंतु या सर्वांचा अभ्यास प्रस्तुत ठिकाणी केल्यास शोधनिबंधाचा विस्तार मोठ्या प्रमाणात होईल या भयास्तव येथे फक्त ‘मेक्सिको पर्व’ मधील खाद्यसंस्कृतीचाच अभ्यास केला आहे.
मराठी साहित्य आणि संस्कृती: एक अनुबंध
111 to 120
मानवीजीवनाच्या उत्क्रांतीमध्ये साहित्य आणि संस्कृती यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. साहित्य हे समाजाच्या भावना, विचार, श्रद्धा आणि जीवनपद्धती यांचे प्रतिबिंब मानले जाते. ते केवळ कलात्मक रचना नसून इतिहास, समाजरचना आणि सांस्कृतिक वारसा यांचे दस्तावेज असतात. महाराष्ट्राच्या संदर्भात पाहता, मराठी साहित्याने समाजाच्या मानसिकतेवर खोल परिणाम घडवला आहे. याच साहित्याने लोकांच्या धार्मिक आणि नैतिक जाणीवा जागृत केल्याआहे. तसेच सामाजिक सुधारणांना गतीपणदिली. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव,एकनाथ, रामदास यांसारख्या संतांनी भक्तीच्या माध्यमातून समाजात समानतेचे आणि मानवतेचे तत्त्व रुजवले. पुढे शाहिरी परंपरेने स्वराज्य आणि शौर्याची भावना जागवली. लोकसाहित्याने जनमानसातील आशा, आकांक्षा आणि संस्कृतीचे विविध रंग व्यक्त केले. आधुनिक काळात कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, श्री. म. माटे, आचार्यअत्रे, पु. शी. रेगे, अण्णाभाऊ साठे यांसारख्या लेखकांनी बदलत्या समाजाचे भान आपल्या लेखनातून व्यक्त केले. त्याचबरोबर स्त्रीवादीसाहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्यआणि ग्रामीण साहित्य यांसारख्या प्रवाहांनी मराठी संस्कृतीच्या विविध आयामांना नवे अधोरेखन दिले. म्हणूनच मराठी साहित्य हा केवळ एक कलात्मक साठा नसून तो संस्कृतीचा वाहक आणि समाजपरिवर्तनाचा प्रेरणास्त्रोत आहे. साहित्य आणि संस्कृती यांचा हा अनुबंध केवळ ऐतिहासिक किंवा धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नाही, तर तो आधुनिकतेकडे नेणारा एक पूल आहे. त्यामुळे मराठी साहित्य आणि संस्कृती यांचा परस्परसंबंध समजून घेणे हे आजच्या काळात अधिक महत्त्वाचे ठरते.
शतकातील आदिवासी कविता: सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन
121 to 131
प्रस्तुत लेख ‘शतकातील आदिवासी कविता’ या कवितासंग्रहाच्या आधारे आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचे चित्रण करतो. साठोत्तरी काळात दलित व ग्रामीण साहित्याच्या प्रभावातून आदिवासी साहित्यप्रवाह उदयास आला. भुजंग मेश्राम, वाहरू सोनवणे आणि डॉ. विनायक तुमराम यांच्यासारख्या कवींनी आपल्या लेखणीतून आदिवासींच्या शोषण, दुःख, अन्याय आणि दारिद्र्याचे वास्तव मांडले.
या कविता आदिवासींच्या निरागस, श्रमप्रधान जीवनशैली, निसर्गाशी असलेले त्यांचे निकोप नाते, सामाजिक एकत्मता आणि सणउत्सवांचे (उदा. लग्नसोहळा, होळी) साधे, उत्साही स्वरूप दर्शवतात. त्याचबरोबर भूकेचा तीव्र संघर्ष, दारिद्र्य आणि अस्थैर्यपूर्ण जीवन यावरही त्या प्रकाश टाकतात. आदिवासी कवी माणुसकी आणि स्वातंत्र्याचा आग्रह धरून, आपल्या अस्मितेचा शोध घेतात आणि समाजाच्या विकासातील अडथळे दूर करण्यासाठी धडपडतात.
भाषा व मराठी साहित्यावरील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव
132 to 137
‘भाषा व मराठी साहित्यावरील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव’ शोधत असताना सुरवातीला भाषेच्या उगामा पसूनच्या प्रवासाचे टप्पे समजावून घ्यावे लागतील. मराठी भाषेतील अन्य भाषांचा प्रभाव कसा दिसतो ? तो प्रभाव आवश्यक आहे का ? त्या प्रभावाचे परिणाम भाषेवर कसे होत गेले ? आज घडीला आधुनिक तंत्रज्ञान मराठी भाषेवर कसे परिणाम साधते आहे ? ते आवश्यक आहे का ? इत्यादी प्रश्नाची उत्तरे शोधल्यास उपरोक्त शीर्षकाला समर्पक उत्तर मिळेल.
मराठी अनुवाद साहित्य आणि संस्कृती
138 to 142
जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण युगात संपूर्ण जग झपाट्याने बदलत आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचे जाळे जगभर पसरले आहे. जग हे एक खेडे होण्याच्या मार्गावर आहे. किंबहुना ते झाले आहे. एका देशातील व्यक्ती दुसऱ्या देशातील व्यक्तींच्या अनेक वेळा संपर्कात येत आहे. हा संपर्क येत असताना भाषेचे महत्त्व अनन्य साधारण झाले आहे. जगातील विविध भाषांमधून विविध वाड्मयप्रकारातील साहित्य प्रकाशित होत आहे. त्या साहित्याचा अनुवादही होत आहे. मानवी जीवनामध्ये अनुवाद केलेला अनिरवायस्थान प्राप्त झाले आहे. असे असूनही आज या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते. अथवा तो विषय गौण मानून त्याच्याविषयी फारशी आस्था बाळगली जात नाही. अनुवादाची प्रवृत्ती स्वाभाविक असले तरी ती एक कला आहे. पण ती सहज साध्य कला नाही. ती कष्ट साध्य कला आहे. अनुभवाने ती कला आत्मसात करता येते. ‘अनुवाद’ ही कला आहे. तरी तिला शास्त्रीय पार्श्वभूमी आहे. आपल्या जीवन व्यवहारात मातृभाषा, संपर्क भाषा आणि ज्ञानभाषा असे त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे. आज या भाषेचे ज्ञान होणे गरजेचे झाले आहे. आणि यामधूनच ‘अनुवादा’ ची गरज आवश्यक मानली जाते स्वतःच्या गावापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अनुवादकलेची गरज मानवी जीवनात पडते. किंबहुना आज तिथे क्षेत्र व्यापक झाले आहे.
‘तुका अभंग अभंग’ नाटकातील संत तुकाराम आणि सामाजिक संस्कृती
143 to 151
विष्णू सूर्या वाघ लिखित‘तुका अभंग अभंग’हे नाटक संत तुकारामांच्या विद्रोही आणि समाजसुधारक व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणारे एक परखड वाङ्मय आहे. हे नाटक पारंपरिक भक्तीमूल्यांपेक्षा तुकारामांच्या सामाजिक दृष्टिकोनावर अधिक प्रकाश टाकते. तत्कालीन समाजातील ब्राह्मणसत्ताक व्यवस्थेचा विरोध, जातिभेदाविरुद्धचा संघर्ष, आणि तळागाळातील लोकांसाठी तुकारामांनी केलेले कार्य हे या नाटकाचे केंद्रबिंदू आहेत. नाटकात तुकाराम केवळ एक संत म्हणून नव्हे तर क्रांतिकारी विचारवंत म्हणून उभा राहतो. त्यांच्या तोंडून उच्चारलेले परखड संवाद, आणि समाजातील पाखंडी, भोंदूगिरीवर केलेली टीका, नाटकाला वादग्रस्ततेचे स्वरूप प्राप्त करून देतात. तथापि, हे वाद नाटकाच्या सत्यदर्शी आणि सडेतोड शैलीचे द्योतक आहेत. नाटककाराने तुकारामांचे अभंग, त्यांच्या विचारसरणीचा गाभा, आणि तत्कालीन समाजाची जातीय व मानसिक रचना यांची समांतर मांडणी करत एक प्रभावी सामाजिक चित्र उभे केले आहे. या नाटकाद्वारे आजही समाजातील जातीभेदाचे वास्तव अधोरेखित होते. त्यामुळे‘तुका अभंग अभंग’ही नाट्यकृती केवळ ऐतिहासिक संत चरित्र नसून सामाजिक परिवर्तनाचा एक धारदार साहित्यिक शस्त्र आहे.
ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, आदिवासी, मुस्लिमआदी साहित्यप्रवाहतील संस्कृती दर्शन
152 to 160
स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्यात ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी आणि मुस्लिम यांसारखे महत्त्वपूर्ण वाङ्मयीन प्रवाह उदयास आले. हे प्रवाह केवळ साहित्यिक अभिव्यक्ती नसून, ते महाराष्ट्रातील सांस्कृतिक परिवर्तन, सामाजिक न्याय आणि आत्मभान यांसारख्या मूल्यांचे दर्शन घडवतात. प्रस्तुत लेख या विविध साहित्यप्रवाहांमधून व्यक्त होणाऱ्या संस्कृतीचे सखोल विश्लेषण करतो. ग्रामीण साहित्य कृषीसंस्कृतीचे वास्तव, दलित साहित्य वेदना आणि विद्रोहाची संस्कृती, आदिवासी साहित्य निसर्गाशी असलेले नाते आणि आदिम जीवनशैली, तर स्त्रीवादी साहित्य पुरुषसत्ताक व्यवस्थेला आव्हान देत स्त्रीचे माणूस म्हणून असलेले स्थान स्पष्ट करते. मुस्लिम साहित्यातून धार्मिक सलोखा व बहुधार्मिकता व्यक्त होते. थोडक्यात, हे साहित्यप्रवाह महाराष्ट्राच्या सामाजिकसांस्कृतिक समृद्धीचे गतिमान आणि विस्तृत प्रतिबिंब आहेत.
मराठी साहित्यावरील जागतिकीकरणाचा प्रभाव
161 to 166
जागतिकीकरणामुळे मराठी साहित्य आणि संस्कृतीवर झालेले बहुआयामी परिणाम हा या लेखाचा मुख्य विषय आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतीय शेती व्यवस्था धोक्यात आली असून, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत आणि ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर वाढले आहे, यावर वसंत आबाजी डहाके आणि गोविंद पानसे यांच्या मतांच्या आधारावर भाष्य केले आहे. संस्कृतीचे ‘हृदय अंग’ असलेल्या भाषेवर जागतिकीकरणाचा प्रभाव स्पष्ट केला असून, इंग्रजी भाषेचे वाढते प्राबल्य आणि मराठी भाषेचे बदलते स्थान अधोरेखित केले आहे. साहित्य हे आर्थिक, राजकीय व जागतिक घटनांशी जोडलेले असून, या प्रक्रियेत साहित्याने सामाजिक भाष्य करणे अपेक्षित आहे. साहित्याच्या निर्मितीवर व साहित्यविषयक दृष्टिकोनात होणारे बदल तसेच जागतिकीकरणाशी साहित्याचे नाते तीनचार अंगांनी अभ्यासले जावे, असे मत या लेखात मांडले आहे.
मराठी साहित्य आणि संस्कृती
167 to 174
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती समृद्ध परंपरा, संस्कृती आणि भावविश्व घेऊन उभी आहे. मराठी साहित्य आणि संस्कृती यांचे नाते अतूट आहे, जेथे साहित्य संस्कृतीचा आरसा आहे आणि संस्कृती साहित्याला पोषण देणारी भूमी आहे. संस्कृती ही समाजाची जीवनपद्धती असून त्यात भौतिक, मानसिक घटक, रूढी आणि मूल्ये समाविष्ट आहेत. साहित्य हे एक सांस्कृतिक घटक ठरून संस्कृतीच्या जडणघडणीत सहभागी होते. लेखकाच्या प्रतिभेतून व संवेदनशीलतेतून संस्कृती सिद्ध होते. अव्वल इंग्रजी कालखंडात श्रवण संस्कृतीकडून वाचन संस्कृतीकडे झालेले संक्रमण महत्त्वाचे ठरले. आधुनिक साहित्याने स्वातंत्र्य, समता आणि लोकशाहीची मूल्ये स्वीकारली. थोडक्यात, साहित्य आणि संस्कृतीने परस्परांवर प्रभाव टाकत समाजमन घडवले आहे.
भाषांतरित साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान
175 to 180
मानव सभ्यतेच्या इतिहासात भाषांतरित साहित्य सांस्कृतिक संवाद आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी अपरिहार्य ठरले आहे. प्रस्तुत लेखात आधुनिक तंत्रज्ञान (उदा. मशीन ट्रान्सलेशन, AI) आणि भाषांतराचा संगम कसा साधला गेला याचा वेध घेण्यात आला आहे. तंत्रज्ञानामुळे भाषांतराची गती, व्यापकता आणि सहज उपलब्धता वाढली आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर ज्ञान आणि साहित्याचा प्रसार जलद झाला आहे. मात्र, या प्रक्रियेत साहित्याचा भावार्थ आणि कलात्मकता हरवण्याची आव्हानेही आहेत. गुणवत्तापूर्ण भाषांतरासाठी मानवी संवेदनशीलता आणि तांत्रिक साधने यांचा योग्य समन्वय आवश्यक आहे, असा निष्कर्ष यात मांडला आहे, ज्यामुळे साहित्य आणि संस्कृती अधिक समृद्ध होतील.
दलित आत्मकथनांचा सांस्कृतिक अभ्यास
181 to 192
प्रस्तुत लेख दलित आत्मकथनांचा सांस्कृतिक अभ्यास या विषयावर आधारित आहे. साहित्य हे संस्कृतीचेच एक अंग असून, लेखकाच्या जडणघडणीवर संस्कृतीचा प्रभाव असतो, या मूलभूत विचारावर हा अभ्यास केंद्रित आहे. संस्कृतीच्या विविध व्याख्या आणि घटकांचा मागोवा घेतल्यानंतर, दया पवार यांचे ‘बलुतं’, माधव कोंडविलकर यांचे ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’, शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ आणि लक्ष्मण माने यांचे ‘उपरा’ या प्रमुख दलित आत्मकथनांमधील सांस्कृतिक दर्शनाचे सखोल विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून जातीयता, दारिद्र्य, सामाजिक शोषण, अंधश्रद्धा तसेच प्रतिकार आणि आत्मभान अशा दलित समाजाच्या सांस्कृतिक जीवनातील वास्तववादी पैलूंवर प्रकाश टाकला आहे. दलित साहित्याने पारंपरिक मूल्यांना आव्हान देत, बोलीभाषेचा गौरव करत आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन संस्कृतीचे नवे आकलन कसे मांडले, हे निष्कर्ष नोंदवले आहेत. या आत्मकथनांनी दलित समाजाच्या अस्मितेचे नवे सांस्कृतिक चित्र रेखाटले आहे.
स्त्रीवादी साहित्यप्रवाहातील संस्कृती दर्शन
193 to 199
प्रस्तुत लेख स्त्रीवादी साहित्यप्रवाहातील संस्कृती दर्शन या विषयावर आधारित आहे. साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असून, दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या स्त्रीच्या अनुभवांना आणि संघर्षांना वाचा फोडण्याचे कार्य स्त्रीवादी साहित्याने केले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीने लादलेल्या मर्यादांना आव्हान देत, हा प्रवाह स्त्रीच्या आत्मभान, स्वातंत्र्य आणि समानतेच्या आकांक्षा अधोरेखित करतो.
मराठी साहित्यात शांता शेळके आणि गौरी देशपांडे यांनी स्त्रीचे भावविश्व व आधुनिक विचार मांडले, तर सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे आणि सिंधुताई सपकाळ यांनी प्रत्यक्ष जीवनात सामाजिक क्रांती घडवली. या साहित्यातून आणि कार्यातून पितृसत्ताक व्यवस्थेवर टीका, स्त्रीपुरुष समानतेची मागणी, आणि बदललेल्या सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन होते. स्त्रीवादी साहित्यप्रवाह हा केवळ साहित्यिक नव्हे, तर सामाजिक क्रांतीचे प्रतिबिंब असून, तो भारतीय संस्कृतीला नवा, न्याय्य आणि प्रगतीशील दृष्टिकोन देतो.
भारतीय साहित्य आणि प्रसार माध्यमे
200 to 205
हा शोधनिबंध भारतीय साहित्य आणि प्रसार माध्यमे यांच्या परस्परसंबंधांचे विश्लेषण करतो. साहित्य म्हणजे विचार, भावना आणि कल्पनांना शब्दांद्वारे व्यक्त करणारी कलात्मक मांडणी, जी संस्कृतीचे आणि समाजजीवनाचे चित्रण करते. याउलट, प्रसार माध्यमे (उदा. वृत्तपत्रे, दूरदर्शन, इंटरनेट) माहिती, शिक्षण, मनोरंजन आणि सामाजिक बदलांसाठी आवश्यक आहेत. ही माध्यमे ज्ञानप्रसार आणि जागरूकता निर्माण करण्याचे काम करतात. तंत्रज्ञानाच्या युगात, सोशल मीडिया माहितीची देवाणघेवाण सुलभ करत आहे, परंतु त्याचा वापर विचारपूर्वक करण्याची गरज आहे. प्रसार माध्यमांचे फायदे आणि प्रकार (छापील, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल) स्पष्ट करून, त्यांचा समाजावरील सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव तसेच शिक्षणातील योगदान अधोरेखित करण्यात आले आहे.
प्रसार माध्यमांचा साहित्य व संस्कृती वर होणारा परिणाम
206 to 210
प्रस्तुत लेख प्रसारमाध्यमे, साहित्य आणि संस्कृती यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधांचे विश्लेषण करतो. प्रसारमाध्यमे, ज्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते, ती समाजाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा आरसा आहेत. वर्तमानपत्रे, रेडिओ, दूरदर्शन आणि इंटरनेट यांसारखी माध्यमे माहिती आणि मनोरंजनाचा प्रसार करतात, जनजागृती करतात आणि सामाजिक बदल घडवतात. भारतीय संस्कृती प्राचीन आणि समृद्ध असून, ती एकता, अध्यात्म आणि कलांना महत्त्व देते. प्रसारमाध्यमे माहिती आणि मनोरंजन पुरवून समाजावर परिणाम करतात, कला व संस्कृतीचे जतन करतात. विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी ती उपयुक्त आहेत, परंतु त्यांच्या अतिवापरामुळे आणि चुकीच्या माहितीमुळे दुष्परिणाम होऊ शकतात. निष्कर्षानुसार, प्रसारमाध्यम हे संस्कृतीचे दर्शन घडवणारे एक शक्तिशाली साधन आहे, पण त्याचे व्यापारीकरण झाले आहे.
मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान
211 to 217
मराठी भाषेचा सुमारे हजार वर्षांचा दीर्घ इतिहास असला तरी, आधुनिक युगात भाषेचा विकास माहिती तंत्रज्ञान आणि संगणक यांच्या वापरावर अवलंबून आहे. हा लेख मराठी भाषा आणि तंत्रज्ञान यांच्यातील अतूट, परस्परपूरक संबंधावर प्रकाश टाकतो. अनेक भाषांप्रमाणे मराठीलाही तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःला ज्ञानभाषा बनवण्याची गरज आहे. युनिकोडमुळे संगणकावर मराठीचा वापर सुलभ झाला असून, इंटरनेट आणि मोबाईल तंत्रज्ञानामुळे भाषेचा प्रसार वेगाने वाढत आहे. तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची उदासीनता दूर करून, मराठी भाषकांनी डिजिटल माध्यमांमध्ये आशय निर्मितीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सोशल मीडियामुळे मराठीला नवे रूप मिळत आहे. भविष्यकाळात AI, रोबोटिक्स या क्षेत्रांत मराठीचा समावेश करून, दैनंदिन व्यवहारात मराठीचा आग्रह धरून तिचा विकास व संवर्धन करणे अपरिहार्य आहे.
भटका विमुक्त वडार समाज आणि संस्कृती
218 to 228
हा शोधनिबंध वडार समाजाच्या संस्कृती आणि जीवनशैलीत ब्रिटिशांच्या राजवटीपासून ते स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या बदलांचे विश्लेषण करतो. १८७१ मध्ये ‘गुन्हेगार जमात’ म्हणून घोषित झालेला हा समाज १९५२ नंतर ‘विमुक्त’ झाला. पारंपरिक दगड-मातीच्या व्यवसायामुळे होणारी त्यांची भटकंती आता शिक्षण, औद्योगिकीकरण आणि सामाजिक चळवळींमुळे संपुष्टात येत आहे. वडार समाजाने शिक्षण घेऊन उच्च सरकारी पदे, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात यश मिळवले आहे. पारंपारिक पोषाख, विवाह पद्धती आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत, तर जातपंचायत व्यवस्था आणि वडारबोली हळूहळू लोप पावत आहे. व्यसनाधीनता आणि पारंपरिक व्यवसायाचा ऱ्हास यांसारखी आव्हाने असूनही, वडार समाजाने मुख्य प्रवाहात येण्याची केलेली ही प्रगती संथ असली तरी लक्षणीय आहे, हे लेखात स्पष्ट होते.
मराठी साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान
229 to 233
आधुनिक तंत्रज्ञान हे साहित्य क्षेत्रातील एक महत्त्वाचे साधन बनले आहे. ज्यामुळे साहित्य निर्मिती, वितरण आणि वाचन या प्रक्रिया अधिक सोप्या आणि वेगवान झाले आहेत. डेस्कटॉप पब्लिशिंग पासून ते इंटरनेट पर्यंत तंत्रज्ञानाने लेखकांना नवीन व्यासपीठे दिली आहेत. वाचकांना साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर साहित्याला एक नवीन स्वरूप दिले आहे. मराठी साहित्य ही महाराष्ट्रातील मराठी भाषेत रचलेली एक समृद्ध कलाकृती आहे, ज्यात लोकगीते, गद्य आणि कविता यांचा समावेश आहे. तंत्रज्ञान हे केवळ मराठी भाषेला अभिव्यक्तीचे साधन देत नाही तर, माहितीचा संग्रह, सादरीकरण, आणि प्रसारातही मदत करते. ज्यामुळे साहित्याचा विस्तार होतो.
मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे एक अतूट नाते आहे, कारण भाषेचा विकास हा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होत जातो. तंत्रज्ञान जसे विकसित होते, तशी तशी भाषा विकसित होते. साहित्य व तंत्रज्ञान यांचे संबंध हे सर्जन व अभिव्यक्तीच्या साधनांमधील संबंध आहेत. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावर भाषेचा विकास करणे शक्य आहे. मराठी भाषेच्या संदर्भात आपणास विचार करावयाचा झाल्यास, आपली भाषा ही ज्ञानभाषा होणे अत्यंत गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून भाषेला विकसित करणे सहज शक्य आहे.
मराठी-कन्नड अनुवाद साहित्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण
234 to 243
मराठी आणि कन्नड या शेजारील भाषांमध्ये प्राचीन काळापासून सांस्कृतिक व साहित्यिक देवाणघेवाण सुरू आहे. संत साहित्याच्या (उदा. वचनकार आणि संत परंपरा) माध्यमातून भक्ती आणि मानवतेचे तत्त्वज्ञान दोन्हीकडे रुजले. अनुवाद साहित्य हा या दोन संस्कृतींना जोडणारा महत्त्वाचा सेतू ठरला आहे. या अनुवादांमुळे मराठी वाचकांना कन्नड साहित्यातील लोकजीवन, रूढी, परंपरा, आणि स्त्रीस्थितीची जीवनदृष्टी समजली, तर कन्नड वाचकांना मराठी कादंबरी, नाटक, आणि कवितांची ओळख झाली. आधुनिक काळात दलित व ग्रामीण साहित्याच्या अनुवादाने सामाजिक प्रश्नांवर नवीन दृष्टिकोन दिला. सीमाभागातील लोककला (उदा. लावणी, यक्षगान), संगीत, वेशभूषा आणि दैनंदिन जीवनातील मिश्रभाषिक व्यवहार या सांस्कृतिक अनुबंधाची साक्ष देतात. हा अनुबंध केवळ साहित्यिक नसून मानवी ऐक्याचा जिवंत पुरावा आहे, जो सहकार्य आणि आपुलकीने टिकून आहे.
मराठी साहित्य प्रवाहात ग्रामीण साहित्याची गरज
244 to 252
मराठी साहित्य प्रवाहात ग्रामीण साहित्याची गरज हा महत्त्वाचा घटक आहे. १९६० नंतर उदयास आलेल्या या प्रवाहाची प्रेरणा ‘गाव’ आहे, ज्यात शेती आणि गावकरी जीवन केंद्रस्थानी आहे. ‘पिराजी पाटील’ (१९०३) ही पहिली ग्रामीण कादंबरी आणि बहिणाबाई चौधरी पहिली ग्रामीण कवयित्री मानली जाते. स्वातंत्र्यापूर्वी र.वा. दिघे तर स्वातंत्र्योत्तर गो.नी. दांडेकर, व्यंकटेश माडगुळकर, अण्णाभाऊ साठे यांसारख्या लेखकांनी या साहित्याला समृद्ध केले. ग्रामीण जीवनातील वास्तव, बदलती संस्कृती, कृषी जीवन आणि समूह भावना शहरांतील लोकांना समजावून सांगणे, तसेच ग्रामीण लेखकांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे ही ग्रामीण साहित्याची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. आधुनिकतेमुळे खेड्यांचे स्वरूप बदलले आहे, परंतु ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन आणि साहित्याचा चिरकाळ टिकाव यासाठी साहित्य आणि समाज यात एकसंधता येणे गरजेचे आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सांस्कृतिक अनुबंध आणि सीमाभागातील मराठी
253 to 265
कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाषिक आणि सांस्कृतिक संबंधांचा दीर्घ, जिव्हाळ्याचा आणि गुंतागुंतीचा इतिहास आहे. भाषा वेगवेगळ्या असल्या तरी दोन्ही प्रदेशांतील संस्कृती एक आणि समान आहे, जिथे लोकांनी धर्मनिरपेक्षतेची भावना जपून एकमेकांच्या चालीरीती, कला, साहित्य आणि सण-उत्सव प्रेमाने स्वीकारले आहेत. राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, शिवशाही अशा अनेक राजघराण्यांनी या प्रदेशांवर राज्य केल्याने ऐतिहासिक अंतर्गत नाते निर्माण झाले आहे. विठ्ठलाचे दैवत आणि शिवाजी महाराजांचे मूळ यांसारख्या बाबी दोन्ही संस्कृतींचे समन्वयशील प्रतीक आहेत. दोन्ही भाषा भिन्न भाषिक गटांतील असूनही (कन्नड-द्राविड, मराठी-इंडो-आर्यन) त्यांनी एकमेकांवर प्रभाव टाकला आहे, ज्यामुळे मराठीत अनेक कन्नड शब्द आले आहेत आणि सीमाभागात मिश्र भाषा तयार झाली आहे. सीमावाद राजकीय असला तरी सर्वसामान्य लोक रोटी-बेटी व्यवहार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण मुक्तपणे करतात, ज्यामुळे दोन्ही प्रदेशांमधील सौहार्दपूर्ण संबंध अधिक दृढ होतात.कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाषिक आणि सांस्कृतिक संबंधांचा दीर्घ, जिव्हाळ्याचा आणि गुंतागुंतीचा इतिहास आहे. भाषा वेगवेगळ्या असल्या तरी दोन्ही प्रदेशांतील संस्कृती एक आणि समान आहे, जिथे लोकांनी धर्मनिरपेक्षतेची भावना जपून एकमेकांच्या चालीरीती, कला, साहित्य आणि सण-उत्सव प्रेमाने स्वीकारले आहेत. राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, शिवशाही अशा अनेक राजघराण्यांनी या प्रदेशांवर राज्य केल्याने ऐतिहासिक अंतर्गत नाते निर्माण झाले आहे. विठ्ठलाचे दैवत आणि शिवाजी महाराजांचे मूळ यांसारख्या बाबी दोन्ही संस्कृतींचे समन्वयशील प्रतीक आहेत. दोन्ही भाषा भिन्न भाषिक गटांतील असूनही (कन्नड-द्राविड, मराठी-इंडो-आर्यन) त्यांनी एकमेकांवर प्रभाव टाकला आहे, ज्यामुळे मराठीत अनेक कन्नड शब्द आले आहेत आणि सीमाभागात मिश्र भाषा तयार झाली आहे. सीमावाद राजकीय असला तरी सर्वसामान्य लोक रोटी-बेटी व्यवहार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण मुक्तपणे करतात, ज्यामुळे दोन्ही प्रदेशांमधील सौहार्दपूर्ण संबंध अधिक दृढ होतात.
ग्रामीण साहित्य प्रवाहातील संस्कृती दर्शन
266 to 271
मराठी ग्रामीण साहित्य हा आधुनिक मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा आणि वास्तववादी प्रवाह आहे, ज्याची सुरुवात १९५० नंतर कथा आणि कादंबरीतून झाली. हे साहित्य ग्रामीण जीवन, तेथील बोलीभाषा, रूढी, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि कृषी-केंद्रित संस्कृतीचे चित्रण करते. पाटील, बलुतेदार, कारू-नारू यांसारख्या सामाजिक रचनेचे दर्शन घडते.
ग्रामीण कविता (बहिणाबाई), कथा (व्यंकटेश माडगूळकर, आनंद यादव) आणि कादंबरी (रा. रं. बोराडे, उद्धव शेळके) या प्रकारांमधून शेतकऱ्यांचे कष्टमय जीवन, सामाजिक ताणतणाव, आणि उपेक्षितांच्या व्यथांचे चित्रण झालेले आहे. हे साहित्य केवळ जीवनाचे वास्तववादी दर्शन नसून, ग्रामीण संस्कृतीचे जतन व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे एक सशक्त साधन आहे.
प्रसारमाध्यमांचा मराठी साहित्य आणि संस्कृतीवरील प्रभाव
272 to 282
हा शोधनिबंध मराठी साहित्य आणि संस्कृतीवर प्रसारमाध्यमांचा (मुद्रण, रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट) होणारा गुंतागुंतीचा प्रभाव स्पष्ट करतो. प्रसारमाध्यमे साहित्यकृतींचे वैश्विकीकरण करून (उदा. ‘नटसम्राट’, ‘सैराट’चे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन) आणि ब्लॉग्ससारखे नवीन साहित्यिक प्रकार निर्माण करून सकारात्मक योगदान देतात. मात्र, ती वाचन सवयी कमी करतात आणि व्यावसायिक दबावामुळे उथळ साहित्याला प्रोत्साहन देतात. मुद्रण यंत्राने साहित्य लोकांपर्यंत नेले, रेडिओने श्रवणीय केले आणि सोशल मीडियाने जागतिक व्यासपीठ दिले, पण त्याचवेळी सांस्कृतिक एकसमानता आणि अस्मितेस आव्हान दिले. मराठी साहित्य आणि संस्कृतीची मौलिकता टिकवून ठेवण्यासाठी प्रसारमाध्यमांचा जबाबदार वापर आवश्यक आहे.
दलित स्त्रियांच्या आत्मकथनातून प्रकट झालेली संस्कृती
283 to 286
मराठी दलित आत्मकथनांमध्ये स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मकथनांना एक विशेष महत्त्व आहे. अस्पृश्यांमधील आणि गावगाड्याबाहेरील भिन्न भिन्न जातींच्या लेखकांनी/लेखिकांनी आपापली आत्मकथने लिहून दलित साहित्य, पर्यायाने मराठी साहित्य समृद्ध केले. या आत्मकथनांमुळे अनोखे जीवनदर्शन समोर आले. दलित आत्मकथनांनी भारतीय समाज आणि संस्कृतीचे दशावतार समोर आणले. निरलेप वृत्तीने आणि डोळस दृष्टीने जर ही आत्मकथने आपण अभ्यासली, तर समाज आणि संस्कृतीचे धक्कादायक पदर उलगडत जातात. जीवनातील विशेष अनुभवांना शब्दबद्ध करताना, पुन्हा तेच जगणे मानसिक पातळीवर प्रत्ययाला येऊन प्रांजळपणे आत्मकथनात्मक लेखन अविष्कृत होत असते. तसे ते अविष्कृत होणे ही लेखकाची मानसिक गरज असली तरी, निकोप सामाजिक-सांस्कृतिक वाढीसाठी ही गरज फलदायी ठरू शकते हे नाकारता येत नाही. अशा लेखनामुळेच समाज, साहित्य आणि संस्कृती ही समृद्ध होत असते. ‘जिणं आमचं’ हे बेबी कांबळे यांचे आत्मकथन हे दलित स्त्रीच्या जीवनानुभवाचे सशक्त दर्शन घडवते. या आत्मकथनातून भारतीय संस्कृतीविषयीची जाण काही ठराविक कृपात आपल्याला दिसून येते. त्या जाणिवा दलित बहुजन स्त्रीच्या नजरेतून उमटलेल्या असल्या तरी, नवसंस्कृतीच्या निर्माणसाठी अधिक महत्त्वाच्या ठरतात.
साहित्य, समाज आणि संस्कृती : एक अनुबंध
287 to 294
प्रस्तुत लेख साहित्य, समाज आणि संस्कृती यांच्यातील अविभाज्य संबंधाचा अनुबंध स्पष्ट करतो. साहित्य हे समाजाचा आरसा असून, ते मानवी जीवन, समस्या, रूढी आणि परंपरा यांचे प्रतिबिंब दर्शवते. साहित्यातूनच समाजाचे वैचारिक, मानसिक आणि सांस्कृतिक पोषण होते. कलाकृतीकार आपल्या लेखनातून सामाजिक जाणीव व समस्या निवारण्यासाठी प्रेरणा देतात. संस्कृती म्हणजे प्रकृतीवर केलेले संस्कार असून, साहित्यातून तिचे दर्शन घडते आणि तिचे संवर्धन होते. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे आणि जागतिकीकरणामुळे पारंपरिक जीवनमूल्ये व संस्कृती संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे. लेखकाने सृजनशील साहित्याच्या गरजेवर जोर दिला आहे, जेणेकरून राष्ट्रीय संचितांचे रक्षण होऊन, समाजात माणुसकी, कुटुंबवत्सलता आणि सकारात्मक जीवनमूल्ये पुन्हा रुजतील. साहित्य, समाज आणि संस्कृती परस्परांना पूरक ठरत असल्याने, या तीनही घटकांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.
कष्टप्रद दुःखाचे दुष्टचक्र : ‘अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट’
295 to 301
‘अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट’ ही आनंद विंगकर यांची पहिली कादंबरी महाराष्ट्रातील एका शेतकरी कुटुंबाचे विदारक वास्तव मांडते. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हे कथानक, यशानाना नावाच्या कर्जबाजारी शेतकऱ्याभोवती फिरते, जो सततचा दुष्काळ, कर्जाचा ताण आणि वैयक्तिक अपयशामुळे आत्महत्या करतो. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबावर कोसळलेले अस्मानी संकट आणि समाजाचे बदलणारे चित्र कादंबरी चित्रित करते. आत्महत्येनंतर थोरली मुलगी उषा सर्व व्यक्तिगत भावनांचा त्याग करून लहान बहिणींना घेऊन नव्या निर्धाराने परिस्थितीशी लढायला सज्ज होते. ही कादंबरी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण समाजजीवन, जात वास्तव आणि बदलत्या संबंधांचे चित्रण करते, ज्यामुळे ती शोषित शेतकरी समूहाचे प्रतिनिधित्व करते.
संविधानवादी साहित्य सिद्धांताचे स्वरूप
302 to 308
प्रस्तुत शोधनिबंध माझ्या ‘संविधानवादी साहित्य सिद्धांत आणि दिशा’ या ग्रंथावर आधारित आहे. मराठीमध्ये किंवा कुठल्याही भारतीय भाषांमध्ये आज संविधानवादी साहित्य अस्तित्वात नाही. संविधानवादी साहित्याचा सिद्धांत मांडून असा साहित्यप्रवाह उदयाला येऊ शकेल काय? मी हे खात्रीपूर्वक सांगेन की असा साहित्यप्रवाह निश्चितच उदयाला येऊ शकतो. आणि त्याला असंख्य धुमारे फुटून तो मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकतो. कारण भारत भूमीमध्ये संविधानवादी साहित्यप्रवाह उदयाला येण्यासाठी व विकसित होण्यासाठी खूप मोठा तात्त्विक, मूल्यात्मक व जीवनानुभवविषयक आधार आहे. भारतीय समाजजीवनामध्ये उपलब्ध असलेली वैविध्यपूर्ण अनुभव सामुग्री संविधानवादी जीवनदृष्टी असलेल्या प्रतिभावंत साहित्यिकाचा स्पर्श होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु सुस्पष्ट अशी संविधानवादी जीवनदृष्टी लाभलेले साहित्यिकच इथे अस्तित्वात नाहीत. म्हणून जे संविधानवादी साहित्य निदान १९५५ ते ६० पासूनच निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू व्हावयास हवी होती. परंतु ती झाली नाही. ती प्रक्रिया सुरू न होण्याची कारणे भारतातील विशिष्ट समाज व्यवस्थेत दडलेली आहेत. हा सिद्धांत मांडत असताना त्या साऱ्या कारणांचा शोध घ्यायचा आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’तील संस्कृती
309 to 318
संस्कृतमधील भगवद्गीतेचे भाषांतर म्हणून ‘ज्ञानेश्वरी’ हा मराठीत प्रसिद्ध असलेला ग्रंथ आहे. असे असले तरी ते ‘भाषांतर नसून स्वतःचे मौलिक काव्यात्मक लेखन आहे’, कारण ते भगवद्गीतेवरचे भाष्य आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीला “भावार्थ दीपिका” असेही म्हणतात, हा ग्रंथ इ.स. १२९० साली लिहून पूर्ण केला. वारकरी संप्रदायाला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहून मराठी साहित्य आणि भाषेच्या वैभवात फार मोठे योगदान दिले आहे. हा ग्रंथ मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरला आहे. कर्मकांड, जातिव्यवस्थेला विरोध करून त्यांनी भोंदू बुवाबाजीवर प्रहार केला. वैदिक धर्मव्यवस्थेने त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला छळले असतानाही त्यांनी समाज कल्याणासाठी विश्व प्रार्थना केली. आज ‘ज्ञानेश्वरी’ला ७३५ वर्षे पूर्ण होताहेत. सातशे वर्षानंतरही ‘ज्ञानेश्वरी’चे मोल कमी झालेले नाही; एखादे अभिजात साहित्यच असे चिरकाल टिकून राहू शकते. ‘ज्ञानेश्वरी’मधून संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतीचे जे दर्शन घडवले आहे ते कालातीत आहे. ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवद्गीतेवरील सुंदर मराठी भाषांतरात्मक टीका असली ती केवळ धार्मिक ग्रंथच नाही, तर तत्कालीन समाज, संस्कृती, जीवनशैली, तत्त्वज्ञान, आचार-विचार यांचे प्रतिबिंबही आहे. ज्ञानेश्वरीतून तत्कालीन भारतीय संस्कृतीचे समृद्ध दर्शन घडते. ज्ञानेश्वरी, मराठी साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान, विज्ञान, भक्ती, ग्रामीण जीवन, संत परंपरा, संप्रदाय.
अनुवादित साहित्याचे स्वरूप
319 to 325
प्रस्तुत लेख यशवंत राऊत यांच्या ‘अनुवादित साहित्याचे स्वरूप’ या लेखावर आधारित आहे, ज्यात अनुवाद या संकल्पनेची व्याप्ती आणि महत्त्व स्पष्ट केले आहे. जागतिकीकरणाच्या युगात अनुवाद कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉ. राऊत यांच्या मते, ‘अनुवाद’ ही व्यापक संज्ञा असून ‘भाषांतर’ हा तिचाच एक प्रकार आहे. एका भाषेतील आशय व अनुभव दुसऱ्या भाषेत सकसपणे उतरवण्यासाठी अनुवादकाला मूळ आणि लक्ष्य अशा दोन्ही भाषांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. या संदर्भात, लेखात वि. वा. शिरवाडकर यांच्या रूपांतरित नाटकांचा आढावा घेण्यात आला आहे. ‘दूरचे दिवे’ (‘आयडियल हसबंड’) आणि ‘राजमुकुट’ (‘मॅकबेथ’) यांसारख्या कलाकृतींमध्ये शिरवाडकरांनी पाश्चात्त्य कथानकांना भारतीय आचार-विचारात यशस्वीरीत्या बसवले. ‘नटसम्राट’ हे ‘किंग लियर’वर आधारित असले तरी, शिरवाडकरांनी केलेले हे रूपांतरण मराठी रंगभूमीवरील एक अव्वल दर्जाची कलाकृती ठरले. शिरवाडकरांनी जगप्रसिद्ध नाटककारांच्या कृतींचे रूपांतर करून मराठी साहित्य समृद्ध केले आहे.
स्त्रीवादी लेखन करणाऱ्या लेखिकांची अभिव्यक्ती व सामाजिकता
326 to 335
हा शोधनिबंध मराठीतील स्त्रीवादी लेखिकांची अभिव्यक्ती आणि सामाजिकता यांचा मागोवा घेतो. स्त्रीकेंद्री अनुभवविश्व, लैंगिक जाणिवा आणि पितृसत्तेतील दडपशाहीवर केंद्रित असलेले हे लेखन स्त्रीला समान हक्क व सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या दिशेने कार्यरत आहे. लेखिका समाजातील रूढी व दुहेरी मानके उघड करून स्त्री-पुरुष संबंधांचे वास्तव मांडतात. स्त्रीवाद केवळ विचारप्रणाली नसून तो समाजपरिवर्तनाचा राजकीय प्रयत्न आहे.
एकोणिसाव्या शतकातील रमाबाई रानडे (आमच्या आयुष्यातील आठवणी) आणि ताराबाई शिंदे (स्त्री-पुरुष तुलना) यांच्या लेखनापासून ते साठोत्तरी कालखंडातील कवयित्रींच्या (अनुराधा पाटील, नीरजा) लेखनापर्यंतचा आढावा घेतला आहे. याशिवाय, हरिभाऊ आपटे आणि वा. म. जोशी यांच्या कादंबऱ्यांतील तसेच गडकरींसारख्या नाटककारांच्या साहित्यातील स्त्री-सुधारणेच्या कल्पना आणि त्यांच्या मर्यादा तपासल्या आहेत. आधुनिक काळात ‘नारी समता मंच’ मार्फत स्त्रियांच्या निवारा, आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक स्तरावरील मागण्या या चळवळीचा पुढचा टप्पा दर्शवतात, ज्यातून लिंगभेदरहित कायदे आणि स्वतंत्र स्त्री-अस्तित्वाची मागणी अधोरेखित होते.
मराठी साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान
336 to 340
हा शोधनिबंध मराठी साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यातील अपरिहार्य संबंधांचे विश्लेषण करतो. संत साहित्यापासून मुद्रण युगापर्यंतचा प्रवास पाहता, तंत्रज्ञानाने साहित्य निर्मिती, प्रकाशन आणि प्रसारणाच्या प्रक्रियेत क्रांती घडवली आहे. ई-पुस्तके, ऑडिओबुक्स आणि सोशल मीडियामुळे मराठी साहित्य जगभर पोहोचले आहे. लेखकाला थेट वाचकांपर्यंत पोहोचणे सुलभ झाले आहे. तथापि, बेकायदेशीर वाटप (पायरेसी), गुणवत्तेचा अभाव आणि सखोल वाचन संस्कृतीतील बदल यांसारखी आव्हाने आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल आर्काइव्हमुळे भविष्यात साहित्याला नवीन संधी मिळतील. मराठी साहित्याचे मूळ मूल्य जपत तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने त्याचे जागतिकीकरण करणे आवश्यक आहे, हा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे.