स्त्रीवादी साहित्यप्रवाहातील संस्कृती दर्शन
Main Article Content
Abstract
प्रस्तुत लेख स्त्रीवादी साहित्यप्रवाहातील संस्कृती दर्शन या विषयावर आधारित आहे. साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असून, दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या स्त्रीच्या अनुभवांना आणि संघर्षांना वाचा फोडण्याचे कार्य स्त्रीवादी साहित्याने केले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीने लादलेल्या मर्यादांना आव्हान देत, हा प्रवाह स्त्रीच्या आत्मभान, स्वातंत्र्य आणि समानतेच्या आकांक्षा अधोरेखित करतो.
मराठी साहित्यात शांता शेळके आणि गौरी देशपांडे यांनी स्त्रीचे भावविश्व व आधुनिक विचार मांडले, तर सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे आणि सिंधुताई सपकाळ यांनी प्रत्यक्ष जीवनात सामाजिक क्रांती घडवली. या साहित्यातून आणि कार्यातून पितृसत्ताक व्यवस्थेवर टीका, स्त्रीपुरुष समानतेची मागणी, आणि बदललेल्या सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन होते. स्त्रीवादी साहित्यप्रवाह हा केवळ साहित्यिक नव्हे, तर सामाजिक क्रांतीचे प्रतिबिंब असून, तो भारतीय संस्कृतीला नवा, न्याय्य आणि प्रगतीशील दृष्टिकोन देतो.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
“मी वनवासी” सिंधुताई सपकाळ रिया पब्लिकेशन पुणे.
“स्त्री पुरुष तुलना” ताराबाई शिंदे, सुधीर काळे वर्धा, पुणे.
शांता शेळके यांच्या साहित्यातील स्त्री वेदना डॉ. सविता ज्ञानेश्वर वावगे.
मराठी लोकांची संस्कृती इरावती कर्वे.
सावित्रीबाई फुले काल आणि कर्तृत्व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई.
ऋणानुबंध एक आस्वाद प्रा.नरेंद्र मारवाडे नाथ प्रकाशन औरंगाबाद.