मराठी कवितेत उमटलेले जागतिकीकरणाचे प्रतिबिंब
Main Article Content
Abstract
साहित्य हा समाजमनाचा आरसा असतो, हे आपण वारंवार ऐकत आलो आहोत. समाजात घडणाऱ्या सर्व बऱ्यावाईट घटनांचे पडसाद साहित्यात उमटतात. सभोवताली घडणारे बदल साहित्यावर प्रभाव टाकतात. जागतिकीकरण ही माणसाच्या जगण्यात आणि विचारात अमूलाग्र बदल घडवणारी घटना आहे. मानवी आयुष्याला जागतिकीकरणाने व्यापले आहे. प्रत्येक क्षेत्रात जागतिकीकरणाचा शिरकाव झाला आहे. शांत, संयमी आणि समाधानी आयुष्य जगणाऱ्या सर्वसामान्य कष्टकरी माणसाचे जीवन जागतिकीकरणाने ढवळून निघाले. त्याच्या क्षमतेबाहेरची, आकलनाबाहेरची आणि जगण्याबाहेरची ही गोष्ट त्याला अपरिहार्यता म्हणून स्वीकारावी लागली. तर शहरी माणसाने गरज म्हणून ती स्वीकारली. जागतिकीकरणाचा झगमगाट हा वरवरचा भुलभुलय्या आहे, हे कळण्यासाठी काही वर्षे जावी लागली. आज मात्र जागतिकीकरणाचे घातक परिणाम ठळक होऊ लागले आहेत. गावखेडी, शेतीमाती, उद्योगधंदे, कला, साहित्य, राजकारण आणि समाजकारण अशी सर्वच क्षेत्रे जागतिकीकरणाने प्रभावित झाली आहेत. सुखाच्या संकल्पना बदलल्या आहेत. जीवनमूल्ये बदललेली आहेत. समूहभान नष्ट होऊन आत्मकेंद्री, चंगळवादी वृत्ती फोफावली आहे. याचा परिणाम म्हणून आयुष्यातील आनंदच हरवला आहे. जगण्याच्या या पडझडीचे प्रतिबिंब मराठी कवितेत ठळकपणे पडलेले दिसते.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
महानोर, ना. धों. प्रार्थना दयाघना, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, द्वि. आवृत्ती १९९२
भालेराव, इंद्रजित भुईचे लळासे, आदित्य प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर, प्रथमावृत्ती २०२३
वाघ, विठ्ठल मातीचा झरतो डोळा, सारांश प्रकाशन, नाशिक, प्रथमावृत्ती २०१३
कुवर, रावसाहेब हरवल्या आवाजाची फिर्याद, काव्याग्रह प्रकाशन, वाशिम, प्रथमावृत्ती २०१७
परब, वीरधवल मम म्हणा फक्त, लोकवाड़मय गृह प्रकाशन, मुंबई, प्रथमावृत्ती, २०१६
६) इंगळे, बालाजी मदन मेलं नाही अजून आभाळ, लोकवाड़मय गृह, मुंबई, प्रथमावृत्ती २०१०