मराठी साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान
Main Article Content
Abstract
मराठी साहित्य हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय जीवनाचे प्रतिबिंब आहे. मध्यकाळापासून (संतपंततंत) ते आधुनिक काळापर्यंत कथा, कादंबरी, काव्य, नाटक, चरित्रआत्मचरित्र, प्रवासवर्णन या ललित लेखनाचा समावेश होतो. यात पुन्हा मराठी वाङ्मयातील वेगवेगळे प्रवाह येतात. त्यात दलित, ग्रामीण,आदिवासी, स्त्रीवादी, ख्रिस्ती, मुस्लिम, भटक्या विमुक्तांचे साहित्य, जनसाहित्य, बालसाहित्य, विज्ञान, अनुवादित साहित्य, कामगार साहित्य आदींचा समावेश होतो. एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे साहित्यनिर्मिती, वाचन, प्रसार आणि अभिव्यक्तीच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. मराठी साहित्येतिहास समृद्ध असून त्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिकतेचे सुंदर चित्रण येते. तंत्रज्ञानाचा वेगाने झालेला विकास साहित्यविश्वालाही मोठ्या प्रमाणात प्रभावित करतो आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, ईपुस्तके, पॉडकास्ट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या साधनांमुळे साहित्याचा प्रसार आणि निर्मिती या दोन्ही पातळ्यांवर क्रांती घडली आहे. लेखक आता ब्लॉग, यूट्यूब चॅनेल्स व ऑडिओबुक्सद्वारे वाचकांशी थेट संवाद साधत आहेत. पारंपरिक छापील पुस्तकांसोबतच डिजिटल स्वरूपातील साहित्य अधिक सहज उपलब्ध होत आहे. तसेच, नवोदित लेखकांसाठीही लेखन व प्रसिद्धीचे दरवाजे खुले झाले आहेत. मराठी भाषा आणि साहित्याचे डिजिटायझेशन सुरू असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अनुवाद साधनांनी जागतिक पातळीवर पोहोचण्याची क्षमता वाढली आहे. तथापि, या तंत्रज्ञानाच्या वापरात साहित्यिक गुणवत्ता आणि मौलिकतेचे जतन काळाची गरज आहे. त्यामुळे मराठी साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधताना संतुलन राखणे आवश्यक आहे. या बदलांचा योग्य वापर केल्यास मराठी साहित्याला एक नवीन आयाम मिळू शकतो. या शोधनिबंधात आपण मराठी साहित्याच्या ऐतिहासिक प्रवासाचा आढावा घेऊन आधुनिक तंत्रज्ञानामुळे झालेल्या बदलांवर प्रकाश टाकला आहे.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
डा. नंदकुमार मोरे मराठी भाषा माहिती आणि तंत्रज्ञान, यशवंतराव चव्हण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक. मे २०२३
विनोद जैतमल समाज माध्यमांतील लेखनकौशल्ये सोशल मीडियावरील बदलते लेखनविश्व साकेत प्रकाशन, छ.संभाजीनगर, प्र. आ. २०२४
मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे – तंत्रज्ञान सेवा.
राज्य मराठी विकास संस्था ग्रंथालय (2020).
साहित्याचा सामाजिक संदर्भ WeeklySadhana.in.
साहित्य निर्मिती व वितरणातील तांत्रिक बदल KshitijPatukale.com.
वैज्ञानिक व तांत्रिक संदर्भ साहित्य मराठी विश्वकोश.
साहित्य प्रकार आणि समीक्षा मराठी विश्वकोश.
Joshi, Raviraj : Marathi Monolingual Corpus, Marathi BERT Language Models, and Resources, 2022
Magdum, Vidula : A Marathi Natural Language Processing Library, 2023
Dani, Asang; Sathe, Shailesh R. . A Review of the Marathi Natural Language Processing, 2024
Joshi, Raviraj L3Cube MahaNLP: Marathi Natural Language Processing Datasets, Models, and Library, 2022
Sonawane Patil, Kalpna; Patil, Pradip : Granthalaya Ani Mahitishastra, Prashant Publications, 2022