मराठी-कन्नड अनुवाद साहित्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण
Main Article Content
Abstract
मराठी आणि कन्नड या शेजारील भाषांमध्ये प्राचीन काळापासून सांस्कृतिक व साहित्यिक देवाणघेवाण सुरू आहे. संत साहित्याच्या (उदा. वचनकार आणि संत परंपरा) माध्यमातून भक्ती आणि मानवतेचे तत्त्वज्ञान दोन्हीकडे रुजले. अनुवाद साहित्य हा या दोन संस्कृतींना जोडणारा महत्त्वाचा सेतू ठरला आहे. या अनुवादांमुळे मराठी वाचकांना कन्नड साहित्यातील लोकजीवन, रूढी, परंपरा, आणि स्त्रीस्थितीची जीवनदृष्टी समजली, तर कन्नड वाचकांना मराठी कादंबरी, नाटक, आणि कवितांची ओळख झाली. आधुनिक काळात दलित व ग्रामीण साहित्याच्या अनुवादाने सामाजिक प्रश्नांवर नवीन दृष्टिकोन दिला. सीमाभागातील लोककला (उदा. लावणी, यक्षगान), संगीत, वेशभूषा आणि दैनंदिन जीवनातील मिश्रभाषिक व्यवहार या सांस्कृतिक अनुबंधाची साक्ष देतात. हा अनुबंध केवळ साहित्यिक नसून मानवी ऐक्याचा जिवंत पुरावा आहे, जो सहकार्य आणि आपुलकीने टिकून आहे.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
कन्नड-मराठी लोकसाहित्य व लोक संस्कृती - डॉ. शंकर पाटील, २००१
बदलते मराठी साहित्य व संस्कृती, संपा. प्रा. विलास रणसुभे. श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर.
मराठी साहित्याचा इतिहास - वि. क. राजवाडे.
मराठी-कन्नड साहित्य संबंध - डॉ. यशवंत हाळदनकर.
कन्नड-मराठी साहित्य संपर्क - डॉ. बी. वाय. मंगेशीर.
साहित्य संतृप्ती - प्रा. डॉ. श्रीपती रायमाने. सृष्टी प्रकाशन, बेळगाव. २०२२. पृष्ठ क्र. ५७.
ग्रामीण वाङ्मयाचा इतिहास - चंद्रकुमार नलगे.
महाराष्ट्र-कर्नाटक सांस्कृतिक अनुबंध, संपा. प्रा. डॉ. अ. रा. तोरो. प्रतिमा प्रकाशन, पुणे. २००८. पृष्ठ क्र. ५१.
मराठी लोकनाट्य तमाशा - कला आणि साहित्य - नामदेव व्हटकर. अजब पब्लिकेशन, २००९. पृष्ठ ६३.