‘तुका अभंग अभंग’ नाटकातील संत तुकाराम आणि सामाजिक संस्कृती

Main Article Content

श्रद्धा भानुदास गवंडी

Abstract

विष्णू सूर्या वाघ लिखित‘तुका अभंग अभंग’हे नाटक संत तुकारामांच्या विद्रोही आणि समाजसुधारक व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणारे एक परखड वाङ्मय आहे. हे नाटक पारंपरिक भक्तीमूल्यांपेक्षा तुकारामांच्या सामाजिक दृष्टिकोनावर अधिक प्रकाश टाकते. तत्कालीन समाजातील ब्राह्मणसत्ताक व्यवस्थेचा विरोध, जातिभेदाविरुद्धचा संघर्ष, आणि तळागाळातील लोकांसाठी तुकारामांनी केलेले कार्य हे या नाटकाचे केंद्रबिंदू आहेत. नाटकात तुकाराम केवळ एक संत म्हणून नव्हे तर क्रांतिकारी विचारवंत म्हणून उभा राहतो. त्यांच्या तोंडून उच्चारलेले परखड संवाद, आणि समाजातील पाखंडी, भोंदूगिरीवर केलेली टीका, नाटकाला वादग्रस्ततेचे स्वरूप प्राप्त करून देतात. तथापि, हे वाद नाटकाच्या सत्यदर्शी आणि सडेतोड शैलीचे द्योतक आहेत. नाटककाराने तुकारामांचे अभंग, त्यांच्या विचारसरणीचा गाभा, आणि तत्कालीन समाजाची जातीय व मानसिक रचना यांची समांतर मांडणी करत एक प्रभावी सामाजिक चित्र उभे केले आहे. या नाटकाद्वारे आजही समाजातील जातीभेदाचे वास्तव अधोरेखित होते. त्यामुळे‘तुका अभंग अभंग’ही नाट्यकृती केवळ ऐतिहासिक संत चरित्र नसून सामाजिक परिवर्तनाचा एक धारदार साहित्यिक शस्त्र आहे.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

श्रद्धा भानुदास गवंडी

सहा. प्रा., पार्वतीबाई चौगुले कला आणि विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), मडगाव, गोवा. 

 

How to Cite

श्रद्धा भानुदास गवंडी. (2025). ‘तुका अभंग अभंग’ नाटकातील संत तुकाराम आणि सामाजिक संस्कृती. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 8(04), 143 to 151. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/1466

References

वाघ, विष्णू, तुका अभंग अभंग, पार्थ प्रकाशन, २०००.

मडगावकर, विनय, तिसऱ्या सहस्त्रकारंभी भारतीय नाटक आणि नाटककार, संत सोहिरोबानाथ आंबिये अध्यासन, ताळगाव –गोवा,२०२१.