जागतिकीकरण आणि महानगरीय जीवनाचे मराठी कथेतील प्रतिबिंब

Main Article Content

स्नेहा यशवंत देसाई

Abstract

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दृढ झालेल्या जागतिकीकरणामुळे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनात अमूलाग्र बदल घडले. १९९१ नंतरच्या नव्या आर्थिक धोरणामुळे औद्योगिकीकरण, स्थलांतर आणि शहरीकरणाच्या प्रक्रियेत वेग आला व त्यातून ‘महानगर’ ही संकल्पना ठळकपणे पुढे आली. विविध प्रांतांतील, भाषिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या सहजीवनातून महानगरात मिश्रित संस्कृती आकारली. या नव्या शहरीऔद्योगिक वास्तवाने मराठी साहित्याकडेही लक्ष वेधले.
१९५०६० च्या ग्रामीण साहित्यकेंद्रित प्रवाहानंतर १९७०८० पासून मुंबई, पुणे यांसारख्या शहरांचे जीवनकेंद्री चित्रण सुरू झाले. १९९० नंतरच्या नव्वदोत्तर काळात जयंत पवार, समर खडस, सतीश तांबे, विजय तांबे, पंकज कुरुलकर, मनस्विनी लता रवींद्र, मेघना पेठे आदी लेखकलेखिकांनी महानगरीय जाणीवा कथालेखनातून प्रभावीपणे व्यक्त केल्या. संघर्ष, बेरोजगारी, स्त्रीचे अस्तित्वदर्शन, सामाजिकराजकीय अस्थिरता, तंत्रज्ञानाचा प्रभाव, नात्यांतील तुटकपणा ही केंद्रस्थाने त्यांच्या कथांमध्ये ठळकपणे येतात.
महानगरीय कथेची भाषा ही संमिश्र, प्रयोगशील व काळानुरूप बदलणारी आहे. स्थानिक बोली, स्थलांतरितांच्या भाषिक सवयी, हिंदीइंग्रजी शब्दप्रयोग तसेच माहितीतंत्रज्ञानाशी निगडित संज्ञा या भाषेत गुंफलेल्या आहेत. त्यामुळे महानगरीय कथा ही केवळ आशयदृष्ट्या नव्हे तर भाषिक पातळीवरही आधुनिक, वास्तवदर्शी व वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

स्नेहा यशवंत देसाई

सहायक प्राध्यापक, ई. एस. चे आर. एस. एन. कला आणि विज्ञान महाविद्यालय, फार्मगुडी, पोंडा.

 

How to Cite

स्नेहा यशवंत देसाई. (2025). जागतिकीकरण आणि महानगरीय जीवनाचे मराठी कथेतील प्रतिबिंब. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 8(04), 93 to 101. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/1460

References

कोत्तापल्ले, नागनाथ, आणि दत्ताभगत.जागतिकीकरणानंतरचे मराठी साहित्य.सायनपब्लिकेशन, २०१७.

नन्नवरे,भाऊसाहेब.१९८०नंतरच्यामहानगरीयकथेचाअभ्यास.शिवाजीविद्यापीठकोल्हापूर, २०१९.

पोवार, छाया.मराठी नागरकथा.स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, २००३.

कुलकर्णी, अजय. नव्वदोत्तर मराठी साहित्य.विजय प्रकाशन, २०१८.

हातकणंगलेकर, म. द. मराठी कथा रूप आणि परिसर.श्रीविद्या प्रकाशन,२००८.