शतकातील आदिवासी कविता: सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन

Main Article Content

वृषाली कदम

Abstract

प्रस्तुत लेख ‘शतकातील आदिवासी कविता’ या कवितासंग्रहाच्या आधारे आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचे चित्रण करतो. साठोत्तरी काळात दलित व ग्रामीण साहित्याच्या प्रभावातून आदिवासी साहित्यप्रवाह उदयास आला. भुजंग मेश्राम, वाहरू सोनवणे आणि डॉ. विनायक तुमराम यांच्यासारख्या कवींनी आपल्या लेखणीतून आदिवासींच्या शोषण, दुःख, अन्याय आणि दारिद्र्याचे वास्तव मांडले.
या कविता आदिवासींच्या निरागस, श्रमप्रधान जीवनशैली, निसर्गाशी असलेले त्यांचे निकोप नाते, सामाजिक एकत्मता आणि सणउत्सवांचे (उदा. लग्नसोहळा, होळी) साधे, उत्साही स्वरूप दर्शवतात. त्याचबरोबर भूकेचा तीव्र संघर्ष, दारिद्र्य आणि अस्थैर्यपूर्ण जीवन यावरही त्या प्रकाश टाकतात. आदिवासी कवी माणुसकी आणि स्वातंत्र्याचा आग्रह धरून, आपल्या अस्मितेचा शोध घेतात आणि समाजाच्या विकासातील अडथळे दूर करण्यासाठी धडपडतात.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

वृषाली कदम

मराठी विभाग प्रमुख, मराठा मंडळ पदवी महाविद्यालय बेळगाव.

How to Cite

वृषाली कदम. (2025). शतकातील आदिवासी कविता: सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 8(04), 121 to 131. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/1463

References

1 ते 8 पर्यंतचे संदर्भ आदिवासी साहित्य प्रवाह, डॉ. मनोहर सुरवाडे, सुगम प्रकाशन अमरावती, प्रथम आवृत्ती, पाच जुलै 2012 पृष्ठ क्रमांक 11

शतकातील आदिवासी कविता संपादक प्रा. डॉ. विनायक तुमराम. या कवितासंग्रहातील कवितांमधील संदर्भ क्रमांक 12 ते 18 पर्यंतचे संदर्भ आहेत. पृष्ठ क्रमांक 122, 125, 182, 218, 274.