मराठी साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान
Main Article Content
Abstract
आधुनिक तंत्रज्ञान हे साहित्य क्षेत्रातील एक महत्त्वाचे साधन बनले आहे. ज्यामुळे साहित्य निर्मिती, वितरण आणि वाचन या प्रक्रिया अधिक सोप्या आणि वेगवान झाले आहेत. डेस्कटॉप पब्लिशिंग पासून ते इंटरनेट पर्यंत तंत्रज्ञानाने लेखकांना नवीन व्यासपीठे दिली आहेत. वाचकांना साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर साहित्याला एक नवीन स्वरूप दिले आहे. मराठी साहित्य ही महाराष्ट्रातील मराठी भाषेत रचलेली एक समृद्ध कलाकृती आहे, ज्यात लोकगीते, गद्य आणि कविता यांचा समावेश आहे. तंत्रज्ञान हे केवळ मराठी भाषेला अभिव्यक्तीचे साधन देत नाही तर, माहितीचा संग्रह, सादरीकरण, आणि प्रसारातही मदत करते. ज्यामुळे साहित्याचा विस्तार होतो.
मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे एक अतूट नाते आहे, कारण भाषेचा विकास हा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होत जातो. तंत्रज्ञान जसे विकसित होते, तशी तशी भाषा विकसित होते. साहित्य व तंत्रज्ञान यांचे संबंध हे सर्जन व अभिव्यक्तीच्या साधनांमधील संबंध आहेत. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावर भाषेचा विकास करणे शक्य आहे. मराठी भाषेच्या संदर्भात आपणास विचार करावयाचा झाल्यास, आपली भाषा ही ज्ञानभाषा होणे अत्यंत गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून भाषेला विकसित करणे सहज शक्य आहे.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी भाषा : एक शोध - डॉ. भरत जाधव, डॉ. जयश्री बाबर. पृष्ठ क्रमांक 19.
तंत्रज्ञान आणि मराठी साहित्य - स्वाती संभाजी शिंदे. 2003.
बदलते मराठी साहित्य व संस्कृती सं. प्रा. विलास रणसूभे. श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर.
साहित्य संतृप्ती - प्रा. डॉ. श्रीपती रायमाने. सृष्टी प्रकाशन बेळगाव. 2022. पृष्ठ क्रमांक.