स्त्रीवादी लेखन करणाऱ्या लेखिकांची अभिव्यक्ती व सामाजिकता
Main Article Content
Abstract
हा शोधनिबंध मराठीतील स्त्रीवादी लेखिकांची अभिव्यक्ती आणि सामाजिकता यांचा मागोवा घेतो. स्त्रीकेंद्री अनुभवविश्व, लैंगिक जाणिवा आणि पितृसत्तेतील दडपशाहीवर केंद्रित असलेले हे लेखन स्त्रीला समान हक्क व सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या दिशेने कार्यरत आहे. लेखिका समाजातील रूढी व दुहेरी मानके उघड करून स्त्री-पुरुष संबंधांचे वास्तव मांडतात. स्त्रीवाद केवळ विचारप्रणाली नसून तो समाजपरिवर्तनाचा राजकीय प्रयत्न आहे.
एकोणिसाव्या शतकातील रमाबाई रानडे (आमच्या आयुष्यातील आठवणी) आणि ताराबाई शिंदे (स्त्री-पुरुष तुलना) यांच्या लेखनापासून ते साठोत्तरी कालखंडातील कवयित्रींच्या (अनुराधा पाटील, नीरजा) लेखनापर्यंतचा आढावा घेतला आहे. याशिवाय, हरिभाऊ आपटे आणि वा. म. जोशी यांच्या कादंबऱ्यांतील तसेच गडकरींसारख्या नाटककारांच्या साहित्यातील स्त्री-सुधारणेच्या कल्पना आणि त्यांच्या मर्यादा तपासल्या आहेत. आधुनिक काळात ‘नारी समता मंच’ मार्फत स्त्रियांच्या निवारा, आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक स्तरावरील मागण्या या चळवळीचा पुढचा टप्पा दर्शवतात, ज्यातून लिंगभेदरहित कायदे आणि स्वतंत्र स्त्री-अस्तित्वाची मागणी अधोरेखित होते.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
स्त्रीचं स्थान तिच्या वैवाहिक दर्जाशी जोडून ठरवलं जाऊ नये. तिचं स्थान पुरुषाप्रमाणे तिच्या स्वतःच्या कर्तृत्वावर मोजलं जावं.
विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता, अविवाहिता या भेदावर आधारित सांस्कृतिक / धार्मिक समारंभात स्त्रीची उच्चनीचता व लायकी ठरवली जाता कामा नये.
कुटुंब आणि रक्ताची नाती या पलीकडच्या मानवी संबंधाकडे खुल्या नजरेने बघून त्यांचा स्वीकार व्हावा.
कुटुंब म्हणजे भावनिक आधार देणारी आणि सर्वांच्या विश्वासाला वाव देणारी रचना. ती विवाहावर आधारित अशीच असावी हा आग्रह सोडला पाहिजे.
एकट्या स्त्रीला मैत्रीची दारं बंद नसावीत. तिला बावळट, कुरूप, अविकसित ठेवण्याचा, तिला असुरक्षिततेची भावना देण्याचा समाजाचा डाव उधळून लावला पाहिजे.
स्वतंत्रपणे एकटीनं राहाणं हे दमनकारी समाजव्यवस्थेत कठीण आहे. तेव्हा अशा जीवनाचा खडतर अनुभव आणि होणाऱ्या चुका यांचा संबंध पुरुषाच्या गैरहजेरीशी जोडण्याची गरज नाही.
सरकारी / खाजगी कार्यालयात स्त्रीचं नाव ती लिहील त्या पद्धतीने मान्य व्हावं.