दलित स्त्रियांच्या आत्मकथनातून प्रकट झालेली संस्कृती

Main Article Content

विनोदिनी अरुण मिरजकर

Abstract

मराठी दलित आत्मकथनांमध्ये स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मकथनांना एक विशेष महत्त्व आहे. अस्पृश्यांमधील आणि गावगाड्याबाहेरील भिन्न भिन्न जातींच्या लेखकांनी/लेखिकांनी आपापली आत्मकथने लिहून दलित साहित्य, पर्यायाने मराठी साहित्य समृद्ध केले. या आत्मकथनांमुळे अनोखे जीवनदर्शन समोर आले. दलित आत्मकथनांनी भारतीय समाज आणि संस्कृतीचे दशावतार समोर आणले. निरलेप वृत्तीने आणि डोळस दृष्टीने जर ही आत्मकथने आपण अभ्यासली, तर समाज आणि संस्कृतीचे धक्कादायक पदर उलगडत जातात. जीवनातील विशेष अनुभवांना शब्दबद्ध करताना, पुन्हा तेच जगणे मानसिक पातळीवर प्रत्ययाला येऊन प्रांजळपणे आत्मकथनात्मक लेखन अविष्कृत होत असते. तसे ते अविष्कृत होणे ही लेखकाची मानसिक गरज असली तरी, निकोप सामाजिक-सांस्कृतिक वाढीसाठी ही गरज फलदायी ठरू शकते हे नाकारता येत नाही. अशा लेखनामुळेच समाज, साहित्य आणि संस्कृती ही समृद्ध होत असते. ‘जिणं आमचं’ हे बेबी कांबळे यांचे आत्मकथन हे दलित स्त्रीच्या जीवनानुभवाचे सशक्त दर्शन घडवते. या आत्मकथनातून भारतीय संस्कृतीविषयीची जाण काही ठराविक कृपात आपल्याला दिसून येते. त्या जाणिवा दलित बहुजन स्त्रीच्या नजरेतून उमटलेल्या असल्या तरी, नवसंस्कृतीच्या निर्माणसाठी अधिक महत्त्वाच्या ठरतात.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

विनोदिनी अरुण मिरजकर

संशोधक विद्यार्थिनी, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई.

How to Cite

विनोदिनी अरुण मिरजकर. (2025). दलित स्त्रियांच्या आत्मकथनातून प्रकट झालेली संस्कृती. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 8(04), 283 to 286. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/1483

References

लिंबाळे, शरणकुमार – दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र

कांबळे, बेबी – जिणं आमचं

पवार, उर्मिला – आयदान

जाधव, मनोहर – समकालीन साहित्य चर्चा