मीना प्रभू यांच्या ‘मेक्सिको पर्व’ या प्रवासवर्णनाच्या पुस्तकातील खादयसंस्कृती
Main Article Content
Abstract
मराठी साहित्यात प्रवासवर्णन हा एक साहित्यप्रकार आहे. हा साहित्यप्रकारमध्ययुगीन कालखंडापासून मराठी साहित्यात अस्तित्वात आहे. मध्ययुगीन साहित्यातील महानुभाव, वारकरी साहित्य, बखर साहित्यात याचे पुरावे पाहण्यास मिळतात. आधुनिक कालखंडात हा साहित्यप्रकार एक महत्वाचा साहित्य प्रकार म्हणून ओळखला जातो. आधुनिक कालखंडात शामराव मोरोजी यांनी ‘काशीप्रकाश’ या नावाचे मराठीतील पहिले प्रवासवर्णन इ. स. १८५२ मध्ये लिहिले आहे. त्यानंतर गोडसे भटजी यांचे ‘माझा प्रवास’ लिहिले गेले आहे. त्यानंतर मराठी साहित्यात प्रवासवर्णन या साहित्यप्रकारची परंपरा अव्याहतपणे सुरु झाली आहे. अनंत काणेकर, गंगाधर गाडगीळ, पु. ल. देशपांडे, अण्णाभाऊ साठे यासारख्या अनेकांनी मराठीत प्रवासवर्णने लिहिली आहेत. जागतिकीकरणाच्या प्रारंभीच्या कालखंडात मीना प्रभू यांनी जगभर भटकंती केली आहे. त्यानंतर त्यांनी बारा प्रवासवर्णने लिहिली आहेत.
प्रवासवर्णन हा आत्मनिष्ठ स्वरूपाचा साहित्य प्रकार आहे. तो अनुभवनिष्ठ साहित्यप्रकार आहे. लेखकाने प्रवास केल्यानंतर त्यांचे लेखन केले जाते. म्हणून त्यास वस्तुनिष्ठ साहित्यप्रकार असे ही म्हटले जाते. साहित्यात जसे समाजाचे प्रतिबिंब पडते तसे प्रवासवर्णनामध्ये त्या त्या भागाच्या, देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडत असते. आधिभौतिक आणि भौतिक स्वरूपाची संस्कृती असते. असे संस्कृतीच्या अभ्यासकांनी मत मांडले आहे. संस्कृतीचा अभ्यास व्यापक स्वरूपाचा आहे. सर्वसाधारणपणे संस्कृतीचा अभ्यास करताना समाजातील प्रथा, परंपरा, सण, समारंभ, उत्सव, पोशाख, देव देवता, खाद्यसंस्कृती, आचार विचार, चाली रिती, वर्ग,वंश, लिंग, धर्म, विचारधारा, दंतकथा, श्रद्धा, अंधश्रद्धा, प्रतीके, प्रतिमा, मानवी मूल्ये, भाषा, स्थापत्य, कला यासारखी संस्कृतीची मूल्ये आहेत. ‘मेक्सिको पर्व’ या पुस्तकात संस्कृतीची अनेक मूल्ये अधोरेखित झाली आहेत. परंतु या सर्वांचा अभ्यास प्रस्तुत ठिकाणी केल्यास शोधनिबंधाचा विस्तार मोठ्या प्रमाणात होईल या भयास्तव येथे फक्त ‘मेक्सिको पर्व’ मधील खाद्यसंस्कृतीचाच अभ्यास केला आहे.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
जोशी महादेवशास्त्री (१९६२), भारतीय संस्कृतीकोश. पुणे, भारतीय संस्कृतीकोश मंडळ,
उनि
उनि
वैशंपायन मीना (संपा.) (२०२१), संस्कृतिसंचित. मुंबई, शब्द प्रकाशन
राजाध्याक्ष विजया ( संपा.) (२०१९). मेक्सिको पर्व. पुणे, पुरंदरे प्रकाशन
प्रभू मीना(२०१९), मेक्सिको पर्व. पुणे, पुरंदरे प्रकाशन
प्रभू मीना(२०१९), मेक्सिको पर्व. पुणे, पुरंदरे प्रकाशन
प्रभू मीना(२०१९), मेक्सिको पर्व. पुणे, पुरंदरे प्रकाशन
प्रभू मीना(२०१९), मेक्सिको पर्व. पुणे, पुरंदरे प्रकाशन
प्रभू मीना(२०१९), मेक्सिको पर्व. पुणे, पुरंदरे प्रकाशन