मराठी साहित्य आणि संस्कृती: एक अनुबंध
Main Article Content
Abstract
मानवीजीवनाच्या उत्क्रांतीमध्ये साहित्य आणि संस्कृती यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. साहित्य हे समाजाच्या भावना, विचार, श्रद्धा आणि जीवनपद्धती यांचे प्रतिबिंब मानले जाते. ते केवळ कलात्मक रचना नसून इतिहास, समाजरचना आणि सांस्कृतिक वारसा यांचे दस्तावेज असतात. महाराष्ट्राच्या संदर्भात पाहता, मराठी साहित्याने समाजाच्या मानसिकतेवर खोल परिणाम घडवला आहे. याच साहित्याने लोकांच्या धार्मिक आणि नैतिक जाणीवा जागृत केल्याआहे. तसेच सामाजिक सुधारणांना गतीपणदिली. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव,एकनाथ, रामदास यांसारख्या संतांनी भक्तीच्या माध्यमातून समाजात समानतेचे आणि मानवतेचे तत्त्व रुजवले. पुढे शाहिरी परंपरेने स्वराज्य आणि शौर्याची भावना जागवली. लोकसाहित्याने जनमानसातील आशा, आकांक्षा आणि संस्कृतीचे विविध रंग व्यक्त केले. आधुनिक काळात कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, श्री. म. माटे, आचार्यअत्रे, पु. शी. रेगे, अण्णाभाऊ साठे यांसारख्या लेखकांनी बदलत्या समाजाचे भान आपल्या लेखनातून व्यक्त केले. त्याचबरोबर स्त्रीवादीसाहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्यआणि ग्रामीण साहित्य यांसारख्या प्रवाहांनी मराठी संस्कृतीच्या विविध आयामांना नवे अधोरेखन दिले. म्हणूनच मराठी साहित्य हा केवळ एक कलात्मक साठा नसून तो संस्कृतीचा वाहक आणि समाजपरिवर्तनाचा प्रेरणास्त्रोत आहे. साहित्य आणि संस्कृती यांचा हा अनुबंध केवळ ऐतिहासिक किंवा धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नाही, तर तो आधुनिकतेकडे नेणारा एक पूल आहे. त्यामुळे मराठी साहित्य आणि संस्कृती यांचा परस्परसंबंध समजून घेणे हे आजच्या काळात अधिक महत्त्वाचे ठरते.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
देशपांडे, पु.ल. (१९८१). व्यक्ती आणि वल्ली. मुंबई: मौज प्रकाशन .
जोगळेकर, अ. (२००८). मराठी साहित्याचा इतिहास. पुणे कॉन्टीनेंटल प्रकाशन
करंदीकर, एस.व्ही. (१९९२). संत साहित्य आणि समाज. मुंबई: पॉप्युलर प्रकाशन.
कुलकर्णी, अ.रा. (२००३). महाराष्ट्रातील समाज आणि संस्कृती. पुणे: डायमंड पब्लिकेशन.
माटे, म.श्री. (१९८७). मराठी लोकसाहित्य. पुणे: महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ.
पाटील, ब. (२०१५) दलित साहित्य: एक अभ्यास. पुणे: सुगावा प्रकाशन.
रानडे म.गो. (१९०२) मराठा शक्तीचा उदय. मुंबई विद्यापीठ मुंबई.
टिळक, बा. गं. ( १९१५). गीता रहस्य. पुणे: केसरी प्रकाशन.