प्रसारमाध्यमांचा मराठी साहित्य आणि संस्कृतीवरील प्रभाव

Main Article Content

सर्जेराव सदाशिव जाधव

Abstract

हा शोधनिबंध मराठी साहित्य आणि संस्कृतीवर प्रसारमाध्यमांचा (मुद्रण, रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट) होणारा गुंतागुंतीचा प्रभाव स्पष्ट करतो. प्रसारमाध्यमे साहित्यकृतींचे वैश्विकीकरण करून (उदा. ‘नटसम्राट’, ‘सैराट’चे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन) आणि ब्लॉग्ससारखे नवीन साहित्यिक प्रकार निर्माण करून सकारात्मक योगदान देतात. मात्र, ती वाचन सवयी कमी करतात आणि व्यावसायिक दबावामुळे उथळ साहित्याला प्रोत्साहन देतात. मुद्रण यंत्राने साहित्य लोकांपर्यंत नेले, रेडिओने श्रवणीय केले आणि सोशल मीडियाने जागतिक व्यासपीठ दिले, पण त्याचवेळी सांस्कृतिक एकसमानता आणि अस्मितेस आव्हान दिले. मराठी साहित्य आणि संस्कृतीची मौलिकता टिकवून ठेवण्यासाठी प्रसारमाध्यमांचा जबाबदार वापर आवश्यक आहे.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

सर्जेराव सदाशिव जाधव

प्रमुख, पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.

How to Cite

सर्जेराव सदाशिव जाधव. (2025). प्रसारमाध्यमांचा मराठी साहित्य आणि संस्कृतीवरील प्रभाव. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 8(04), 272 to 282. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/1482

References

जोगळेकर योगिनी, ‘यज्ञ’, नभोवार्ता (पुणे)

जोन्स विल्यम, ‘अ ब्रीफ हिस्टरी ऑफ रेडिओ ड्रामा’, लॉगीट्यूड पब्लिकशन, मास्को (१९७९)

जोशी पुरुषोत्तम, ‘आवाजाची दुनिया’ (मूळ लेखक इक्बाल मस्जीद) आकाशवाणी वार्तापत्र मुंबई १९७२

जोशी भालचंद्र, ‘नभोवाणी’, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, फेब्रुवारी २०००, प्रकाशन

जोशी माधव, ‘हॅलो कंट्रोल’, नभोवार्ता (पुणे), १९७१

देवस्थळी अपूर्वा, ‘तंत्र नभोनाट्याचे’ ‘साहित्य जगत’ या तिमाही अंकातील लेख, २००४ अंक तिसरा नागपूर

देशपांडे पु. ल., ‘रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका’, भाग २ मौज प्रकाशन ५०३

देसाई सुधा, ‘स्मरता तुजला’, नभोवाणी (पुणे) १९७१

देसाई हेमंत, ‘आधुनिक नाट्यविचार’, संवाद पाक्षिकातील लेख, २००७ (४) पुणे

डॉ. अ. ना. देशपांडे: आधुनिक मराठी वाड्मयाचा इतिहास खंड १ ते ५

रा. श्री. जोग: मराठी वाड्मयाचा इतिहास खंड १ ते ४

मधु मंगेश कर्णिक (संपादित) : महाराष्ट्र संस्कृती

साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने): भारतीय संस्कृती

विश्वास मेहेंदळे: मीडिया

भा. ल. भोळे: आकाशवाणीवरील दिवस