कष्टप्रद दुःखाचे दुष्टचक्र : ‘अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट’

Main Article Content

प्रवीण लोंढे

Abstract

‘अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट’ ही आनंद विंगकर यांची पहिली कादंबरी महाराष्ट्रातील एका शेतकरी कुटुंबाचे विदारक वास्तव मांडते. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हे कथानक, यशानाना नावाच्या कर्जबाजारी शेतकऱ्याभोवती फिरते, जो सततचा दुष्काळ, कर्जाचा ताण आणि वैयक्तिक अपयशामुळे आत्महत्या करतो. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबावर कोसळलेले अस्मानी संकट आणि समाजाचे बदलणारे चित्र कादंबरी चित्रित करते. आत्महत्येनंतर थोरली मुलगी उषा सर्व व्यक्तिगत भावनांचा त्याग करून लहान बहिणींना घेऊन नव्या निर्धाराने परिस्थितीशी लढायला सज्ज होते. ही कादंबरी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण समाजजीवन, जात वास्तव आणि बदलत्या संबंधांचे चित्रण करते, ज्यामुळे ती शोषित शेतकरी समूहाचे प्रतिनिधित्व करते.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

प्रवीण लोंढे

सहाय्यक प्राध्यापक (मराठी), दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

How to Cite

प्रवीण लोंढे. (2025). कष्टप्रद दुःखाचे दुष्टचक्र : ‘अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट’. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 8(04), 295 to 301. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/1485

References

‘अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट ‘, आनंद विंगकर, लोकवाङ्मयगृह, मुंबई, २०११.