मुस्लिम मराठी साहित्य: चळवळ आणि दिशा
Main Article Content
Abstract
मराठी साहित्याच्या साठोत्तरी कालखंडामध्ये अनेक नववाङ्मयीन प्रवाह रुढ झाले आहेत, उदा. आदिवासी, स्त्रीवादी इ. या नवप्रवाहांनी मराठी साहित्याचे स्वरुप व्यापक केले आहे. समाजाच्या तळागाळातील माणूस साहित्यिक आणि साहित्याचा विषय झाला. साहित्य निर्मितीचे केंद्र महाराष्ट्रातील काही शहरातच पूर्वी होते. पण साठोत्तरी कालखंडात प्रत्येक गाव खोद्यामधून शिकलेला तरुण मोद्या प्रमाणात साहित्य निर्माण करु लागला. आपल्या जगण्यातले संघर्ष आणि आपली अस्मिता मोठ्या प्रमाणात तो मांडू लागला. विशिष्ट जातीच्या लोकांनी साहित्यातील मक्तेदारी संपुष्टात आणली. समाजातील प्रत्येक समुहगट साहित्याची निर्मिती करु लागला. प्रस्थापित मराठी सारस्वतांनी साहित्यात साधी त्यांची दखलही घेतली नव्हते, असा मुका उपेक्षित समाज बोलू व लिहू लागला हे खूप धाडसाचे काम म्हणायला पाहिजे.
इतर उपेक्षित व दुर्लक्षित समुह गदाप्रमाणेच महाराष्ट्रातील मुस्लिम समाजपण उपेक्षितच होता. मराठी भाषेच्या सुरुवातीच्या काळापासून मुस्लिमांनी मराठी भाषा व साहित्याची सेवा केली तरी त्यांच्या मराठी बोलण्या व लिहिण्यावर शंका घेतली जाऊ लागली. त्यांचे साहित्य नाकारले जाऊ लागले आणि त्यांची उपेक्षा करुन त्यांचे खच्चीकरण करण्यात येऊ लागले. त्याच परिणे मराठी साहित्यामध्ये खलपात्र म्हणूनच या समुह गठाचे चित्रण करण्यात येऊ लागले. मुस्लिमांचे नकारात्मक चित्रण करण्यात येऊ लागले. मुस्लिमांचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन कसे अडचणीत आणता येईल हे एवढेच मराठी सारस्वतकारांनी केले आहे. मध्ययुगीन मराठी साहित्यामध्ये ४९ मुस्लिम मराठी संतानी केलेल्या कार्याची नोंद व दखलही घेतली गेली नाही. म्हणून मुस्लिम मराठी साहित्याची चळवळ निर्माण झाली. वा चळवळीच्या अनुषंगाने संतांच्या साहित्य सेवेला उजागर करणे, आधुनिक मुस्लिम मराठी साहित्यिकांच्या साहित्याची चर्चा करणे आणि मुस्लिम समाजात निर्माण झालेल्या प्रश्नांची चिकित्सा करणे, महाराष्ट्रातला मुस्लिम मराठी भाषेवर प्रेम करतो, मराठीत साहित्य निर्माण करत आहे यासारख्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची मीमांसा मुस्लिम मराठी साहित्याच्या अनुषंगाने केली जात आहे.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
शहाजिंदे फ. म., ‘मुस्लिम मराठी साहित्य परंपरा, स्वरुप आणि लेखकसूची, भूमी प्रकाशन, लातूर, प्रथमावृत्ती २००१.
बेनूर फक्करुहीन, ‘भारतीय मुस्लिमांची समाजरचना आणि मानसिकता’, प्रबोध प्रकाशन समाजवादी प्रबोधनी, इचलकरंजी, प्रथमावृत्ती १९९५.
सय्यद मेहबुब, ‘मुस्लिम मराठी साहित्य: एक अकलन’, सावित्रीबाई फुले प्रकाशन, पुणेः
शानेदिवाण राजेखान, ‘भारतीय मुसलमान वर्तमान आणि भविष्य निर्मिती विचारमंच, कोल्हापूर, प्रथमावृती २००८.
देशमुख नसीमा, ‘मुस्लिम मराठी साहित्य स्वरुप आणि समीक्षा’, मुस्लिम मराठी साहित्य चळवळ प्रकाशन, प्रथमावृत्ती २०१३.