संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’तील संस्कृती
Main Article Content
Abstract
संस्कृतमधील भगवद्गीतेचे भाषांतर म्हणून ‘ज्ञानेश्वरी’ हा मराठीत प्रसिद्ध असलेला ग्रंथ आहे. असे असले तरी ते ‘भाषांतर नसून स्वतःचे मौलिक काव्यात्मक लेखन आहे’, कारण ते भगवद्गीतेवरचे भाष्य आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीला “भावार्थ दीपिका” असेही म्हणतात, हा ग्रंथ इ.स. १२९० साली लिहून पूर्ण केला. वारकरी संप्रदायाला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहून मराठी साहित्य आणि भाषेच्या वैभवात फार मोठे योगदान दिले आहे. हा ग्रंथ मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरला आहे. कर्मकांड, जातिव्यवस्थेला विरोध करून त्यांनी भोंदू बुवाबाजीवर प्रहार केला. वैदिक धर्मव्यवस्थेने त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला छळले असतानाही त्यांनी समाज कल्याणासाठी विश्व प्रार्थना केली. आज ‘ज्ञानेश्वरी’ला ७३५ वर्षे पूर्ण होताहेत. सातशे वर्षानंतरही ‘ज्ञानेश्वरी’चे मोल कमी झालेले नाही; एखादे अभिजात साहित्यच असे चिरकाल टिकून राहू शकते. ‘ज्ञानेश्वरी’मधून संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतीचे जे दर्शन घडवले आहे ते कालातीत आहे. ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवद्गीतेवरील सुंदर मराठी भाषांतरात्मक टीका असली ती केवळ धार्मिक ग्रंथच नाही, तर तत्कालीन समाज, संस्कृती, जीवनशैली, तत्त्वज्ञान, आचार-विचार यांचे प्रतिबिंबही आहे. ज्ञानेश्वरीतून तत्कालीन भारतीय संस्कृतीचे समृद्ध दर्शन घडते. ज्ञानेश्वरी, मराठी साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान, विज्ञान, भक्ती, ग्रामीण जीवन, संत परंपरा, संप्रदाय.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
विज्ञानस्पर्शी ज्ञानेश्वरी - प्रा. गणेश हरी लिमये, बहुजन साहित्यधारा, पुणे, आवृत्ती ४ थी, १४ नोव्हेंबर २०१०
महाराष्ट्रीय संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य - बा. रं. सुंठणकर, लोकवाङ्मय गृह, मुंबई, आवृत्ती ४ थी, ऑगस्ट २०१७
मराठी संतांचे सामाजिक कार्य - डॉ. विष्णू भिकाजी कोलते, अनु. सुमती रमाकांत कोलते, लोकवाङ्मय गृह, मुंबई, आवृत्ती १ ली, ऑगस्ट २०१४
भारतीय संतांचे योगदान - संपा. डॉ. स्नेहल तावरे, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, आवृत्ती १ ली, ८ जानेवारी २०१५
श्री बसवेश्वर ते श्री ज्ञानेश्वर एक चिंतन - कृष्णा मेणसे, लोकवाङ्मय गृह, मुंबई, आवृत्ती ६ वी, जानेवारी २०२३
वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य - संपा. डॉ. शिवाजीराव मोहिते, कर्मवीर प्रकाशन, पुणे, आवृत्ती १ ली, ६ एप्रिल २००८