दलित आत्मकथनांचा सांस्कृतिक अभ्यास

Main Article Content

किशोर सुभाष मुठेकर

Abstract

प्रस्तुत लेख दलित आत्मकथनांचा सांस्कृतिक अभ्यास या विषयावर आधारित आहे. साहित्य हे संस्कृतीचेच एक अंग असून, लेखकाच्या जडणघडणीवर संस्कृतीचा प्रभाव असतो, या मूलभूत विचारावर हा अभ्यास केंद्रित आहे. संस्कृतीच्या विविध व्याख्या आणि घटकांचा मागोवा घेतल्यानंतर, दया पवार यांचे ‘बलुतं’, माधव कोंडविलकर यांचे ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’, शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ आणि लक्ष्मण माने यांचे ‘उपरा’ या प्रमुख दलित आत्मकथनांमधील सांस्कृतिक दर्शनाचे सखोल विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून जातीयता, दारिद्र्य, सामाजिक शोषण, अंधश्रद्धा तसेच प्रतिकार आणि आत्मभान अशा दलित समाजाच्या सांस्कृतिक जीवनातील वास्तववादी पैलूंवर प्रकाश टाकला आहे. दलित साहित्याने पारंपरिक मूल्यांना आव्हान देत, बोलीभाषेचा गौरव करत आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन संस्कृतीचे नवे आकलन कसे मांडले, हे निष्कर्ष नोंदवले आहेत. या आत्मकथनांनी दलित समाजाच्या अस्मितेचे नवे सांस्कृतिक चित्र रेखाटले आहे.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

किशोर सुभाष मुठेकर

संशोधन विद्यार्थी 
A-1/106, ग्रीन हाइव प्लस, सर्वे नं.१६५, फुरसुंगी, पुणे.

How to Cite

किशोर सुभाष मुठेकर. (2025). दलित आत्मकथनांचा सांस्कृतिक अभ्यास. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 8(04), 181 to 192. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/1471

References

जोशी. बी. आर., समाजशास्त्र : मानसशास्त्र, डायमंड पब्लिकेशन्स्, पुणे, जून २००८.

बाबर अशोक, देशीवाद, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, २००५.

नेमाडे भालचंद्र, टीकास्वयंवर, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९०.

Chambers, ‘21 century Dictionary’, Allied Chambers (India) Ltd., New Delhi/Reprinted, 2004.

कालेलकर. ना. गो., भाषा आणि संस्कृती, मौज प्रकाशनगृह, मुंबई, ३री आ., १९९९.

शिरवाडकर. के. रं., आपले विचारविश्व, राजहंस प्रकाशन, जाने. २०१०.

नेमाडे भालचंद्र, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, लोकवाङ्मयगृह, मुंबई, २००३.

पवार दया, ‘बलुतं’, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, प्र. आ. १९७८.

कोंडविलकर माधव, ‘मु. पो. देवाचे गोठणे’, सोनिया ग्लोरिया प्रकाशन, प्र. आ. १९७९.

खरात शंकरराव, ‘तराळअंतराळ’, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, प्र. आ. १९८१.

माने लक्ष्मण, ‘उपरा’, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, प्र. आ. १९८०.