ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, आदिवासी, मुस्लिमआदी साहित्यप्रवाहतील संस्कृती दर्शन

Main Article Content

विशाल गौतम साळवे

Abstract

स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्यात ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी आणि मुस्लिम यांसारखे महत्त्वपूर्ण वाङ्‌मयीन प्रवाह उदयास आले. हे प्रवाह केवळ साहित्यिक अभिव्यक्ती नसून, ते महाराष्ट्रातील सांस्कृतिक परिवर्तन, सामाजिक न्याय आणि आत्मभान यांसारख्या मूल्यांचे दर्शन घडवतात. प्रस्तुत लेख या विविध साहित्यप्रवाहांमधून व्यक्त होणाऱ्या संस्कृतीचे सखोल विश्लेषण करतो. ग्रामीण साहित्य कृषीसंस्कृतीचे वास्तव, दलित साहित्य वेदना आणि विद्रोहाची संस्कृती, आदिवासी साहित्य निसर्गाशी असलेले नाते आणि आदिम जीवनशैली, तर स्त्रीवादी साहित्य पुरुषसत्ताक व्यवस्थेला आव्हान देत स्त्रीचे माणूस म्हणून असलेले स्थान स्पष्ट करते. मुस्लिम साहित्यातून धार्मिक सलोखा व बहुधार्मिकता व्यक्त होते. थोडक्यात, हे साहित्यप्रवाह महाराष्ट्राच्या सामाजिकसांस्कृतिक समृद्धीचे गतिमान आणि विस्तृत प्रतिबिंब आहेत.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

विशाल गौतम साळवे

संशोधक विद्यार्थी, मराठी विभाग,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. 

How to Cite

विशाल गौतम साळवे. (2025). ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, आदिवासी, मुस्लिमआदी साहित्यप्रवाहतील संस्कृती दर्शन. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 8(04), 152 to 160. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/1467

References

मंचरकर, र. बा, ‘सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्य’, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २०११

मेश्राम, केशवे, ‘वाङ्‌मयीन प्रवृत्तीः तत्वबोध’, प्रतिमा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २००७

मराठी वाङ्‌मयाचा इतिहास, खंड७, भाग२

कुलकर्णी, गो.ग, ‘साहित्य : दलित व ललित’, नूतन प्रकाशन, पुणे.

मराठी संज्ञा संकल्पना कोश : संपा. वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर

पोवार, गो. मा, ‘मराठी साहित्य : प्रेरणा व स्वरूप’ (संपादन)

प्रदक्षिणा खंड १ व २, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे.