संविधानवादी साहित्य सिद्धांताचे स्वरूप

Main Article Content

अनंत दा. राऊत

Abstract

प्रस्तुत शोधनिबंध माझ्या ‘संविधानवादी साहित्य सिद्धांत आणि दिशा’ या ग्रंथावर आधारित आहे. मराठीमध्ये किंवा कुठल्याही भारतीय भाषांमध्ये आज संविधानवादी साहित्य अस्तित्वात नाही. संविधानवादी साहित्याचा सिद्धांत मांडून असा साहित्यप्रवाह उदयाला येऊ शकेल काय? मी हे खात्रीपूर्वक सांगेन की असा साहित्यप्रवाह निश्चितच उदयाला येऊ शकतो. आणि त्याला असंख्य धुमारे फुटून तो मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकतो. कारण भारत भूमीमध्ये संविधानवादी साहित्यप्रवाह उदयाला येण्यासाठी व विकसित होण्यासाठी खूप मोठा तात्त्विक, मूल्यात्मक व जीवनानुभवविषयक आधार आहे. भारतीय समाजजीवनामध्ये उपलब्ध असलेली वैविध्यपूर्ण अनुभव सामुग्री संविधानवादी जीवनदृष्टी असलेल्या प्रतिभावंत साहित्यिकाचा स्पर्श होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु सुस्पष्ट अशी संविधानवादी जीवनदृष्टी लाभलेले साहित्यिकच इथे अस्तित्वात नाहीत. म्हणून जे संविधानवादी साहित्य निदान १९५५ ते ६० पासूनच निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू व्हावयास हवी होती. परंतु ती झाली नाही. ती प्रक्रिया सुरू न होण्याची कारणे भारतातील विशिष्ट समाज व्यवस्थेत दडलेली आहेत. हा सिद्धांत मांडत असताना त्या साऱ्या कारणांचा शोध घ्यायचा आहे.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

अनंत दा. राऊत

माजी मराठी विभागप्रमुख, पीपल्स कॉलेज नांदेड.

How to Cite

अनंत दा. राऊत. (2025). संविधानवादी साहित्य सिद्धांताचे स्वरूप. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 8(04), 302 to 308. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/1486

References