मराठी साहित्यावरील जागतिकीकरणाचा प्रभाव
Main Article Content
Abstract
जागतिकीकरणामुळे मराठी साहित्य आणि संस्कृतीवर झालेले बहुआयामी परिणाम हा या लेखाचा मुख्य विषय आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतीय शेती व्यवस्था धोक्यात आली असून, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत आणि ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर वाढले आहे, यावर वसंत आबाजी डहाके आणि गोविंद पानसे यांच्या मतांच्या आधारावर भाष्य केले आहे. संस्कृतीचे ‘हृदय अंग’ असलेल्या भाषेवर जागतिकीकरणाचा प्रभाव स्पष्ट केला असून, इंग्रजी भाषेचे वाढते प्राबल्य आणि मराठी भाषेचे बदलते स्थान अधोरेखित केले आहे. साहित्य हे आर्थिक, राजकीय व जागतिक घटनांशी जोडलेले असून, या प्रक्रियेत साहित्याने सामाजिक भाष्य करणे अपेक्षित आहे. साहित्याच्या निर्मितीवर व साहित्यविषयक दृष्टिकोनात होणारे बदल तसेच जागतिकीकरणाशी साहित्याचे नाते तीनचार अंगांनी अभ्यासले जावे, असे मत या लेखात मांडले आहे.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
“मराठी” भाषा: आणि सर्जन; यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक. प्रथमारवृती२०१०
“जागतिकीकरणा नंतरचे” मराठी साहित्य’डॉ. प्रल्हाद गौरव ग्रंथ, प्रथमावृत्ती, एप्रिल 2017.
‘साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण’भालचंद्र नेमाडे.
‘जागतिकीकरणाचा’ मराठी भाषा व ‘साहित्य’ वरील. परिणाम. डॉ.वासुदेव वळे.