मराठी अनुवाद साहित्य आणि संस्कृती
Main Article Content
Abstract
जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण युगात संपूर्ण जग झपाट्याने बदलत आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचे जाळे जगभर पसरले आहे. जग हे एक खेडे होण्याच्या मार्गावर आहे. किंबहुना ते झाले आहे. एका देशातील व्यक्ती दुसऱ्या देशातील व्यक्तींच्या अनेक वेळा संपर्कात येत आहे. हा संपर्क येत असताना भाषेचे महत्त्व अनन्य साधारण झाले आहे. जगातील विविध भाषांमधून विविध वाड्मयप्रकारातील साहित्य प्रकाशित होत आहे. त्या साहित्याचा अनुवादही होत आहे. मानवी जीवनामध्ये अनुवाद केलेला अनिरवायस्थान प्राप्त झाले आहे. असे असूनही आज या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते. अथवा तो विषय गौण मानून त्याच्याविषयी फारशी आस्था बाळगली जात नाही. अनुवादाची प्रवृत्ती स्वाभाविक असले तरी ती एक कला आहे. पण ती सहज साध्य कला नाही. ती कष्ट साध्य कला आहे. अनुभवाने ती कला आत्मसात करता येते. ‘अनुवाद’ ही कला आहे. तरी तिला शास्त्रीय पार्श्वभूमी आहे. आपल्या जीवन व्यवहारात मातृभाषा, संपर्क भाषा आणि ज्ञानभाषा असे त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे. आज या भाषेचे ज्ञान होणे गरजेचे झाले आहे. आणि यामधूनच ‘अनुवादा’ ची गरज आवश्यक मानली जाते स्वतःच्या गावापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अनुवादकलेची गरज मानवी जीवनात पडते. किंबहुना आज तिथे क्षेत्र व्यापक झाले आहे.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
साहित्य संतृप्तीप्रा. डॉ.श्रीपती रायमाने सृष्टी प्रकाशन बेळगाव. २०२२. पृष्ठ क्र. ५१.
बदलते मराठी साहित्य व सांस्कृति सं. प्रा. विलास रणसूभे.श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर पृष्ठ क्रमांक ११७.
ग्रामीण वाग्मयाचा इतिहास चंद्रकुमार नलगे.
साहित्य विचार संपा. डॉ. पुंडे,डॉ.तावरे स्नेहल, स्नेहवर्धन प्रकाशन,पुणे, प्रथमावृत्ती फेब्रुवारी १९९९. पृष्ठ क्रमांक १७.
महाराष्ट्रातील सामाजिक विचारडॉ.गोविंद मोरेश्वर रानडे पृष्ठ क्रमांक ७१