‘राजधर्म’ राजकीय अधर्माच्या संस्कृतीचे चित्रण
Main Article Content
Abstract
माणूस आणि राजकारण यांचे नाते पुरातन काळापासूनचे आहे. इतरांशी वागण्याबोलण्याची, वर्तनव्यवहाराची प्रत्येक चाल ही एकप्रकारचे राजकारण असते. राजकारणाच्या दोन बाजू असतात. विवेकनिष्ठ, मूल्ययुक्त राजकारण आणि विवेकाला तिलांजली देऊन अविवेकाला खुलेआम शरण गेलेले मूल्यहऱ्हासी राजकारण. आजकाल केवळ देशपातळीवरच नव्हे; तर जागतिक पातळीवर अपवाद सोडला तर हे दुसऱ्या प्रकारचे राजकारण आपणास भगभगीतपणाने दिसते आहे. अशा राजकारणापासून सर्वसामान्य माणसाने कितीही अंतर राखून राहतो असे म्हटले तर ते केवळ अशक्य असते. पर्यायच नाही अशी गत करून ठेवली आहे; या वर्तमानकालीन राजकारणाने. या अर्थाने पाहू जाता राजकारण हे समाजजीवनातील एक अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. राजकारणाची सावली आपण कितीही म्हटले तरी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यावर पडल्याशिवाय राहात नाही. अशा सुष्ठ आणि दुष्ठ राजकारणाचे चित्रण वैचारिक आणि ललित साहित्यातही उमटत असते. अर्थातच ते अल्प अशा स्वरूपाचे आहे. मराठी साहित्यात राजकारणाचे प्रतिबिंब अल्पांशाने पडले आहे, हे मान्यच करावे लागते. राजकारणाची पार्श्वभूमी, राजकारणसमाजकारणाचे आकलन लेखकाजवळ असेल तर त्याच्या साहित्यकृतीत राजकारणाचे यथायोग्य चित्रण येऊ शकते, असे म्हणता येते. त्या अल्पामध्ये उल्लेख करता येईल अशी डॉ. विनोद गायकवाड यांची ‘राजधर्म’ ही कादंबरी आहे. ‘सत्तासंघर्ष’ आणि ‘मूल्यसंघर्ष’ यांच्यातील ताणाचे चित्रण वास्तवाशी समांतरपणे जात ही कादंबरी करते.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
कऱ्हाडे सदा: सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्य, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०११.
खोले विलास (संपा.): महाराष्ट्रातील राजकारणाचे साहित्यातील प्रतिबिंब, प्रतिम प्रकाशन, पुणे, १९९८.
देशपांडे स.ह.: तत्त्वप्रणाली व अंमलबजावणी, (संपा. नरेंद्र दाभोलकर / विनोद शिरसाठ), साधना प्रकाशन, पुणे, २००९.
प्रधान ग.प्र.: महाराष्ट्रातील राजकारणाचे साहित्यातील प्रतिबिंब, विलास खोले (संपा.), प्रतिमा प्रकाशन, पुणे, १९९८.
गुरू गोपाळ: तत्त्वप्रणाली व अंमलबजावणी, साधना प्रकाशन, पुणे, २००९.