कर्नाटक-महाराष्ट्र सांस्कृतिक अनुबंध आणि सीमाभागातील मराठी
Main Article Content
Abstract
कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाषिक आणि सांस्कृतिक संबंधांचा दीर्घ, जिव्हाळ्याचा आणि गुंतागुंतीचा इतिहास आहे. भाषा वेगवेगळ्या असल्या तरी दोन्ही प्रदेशांतील संस्कृती एक आणि समान आहे, जिथे लोकांनी धर्मनिरपेक्षतेची भावना जपून एकमेकांच्या चालीरीती, कला, साहित्य आणि सण-उत्सव प्रेमाने स्वीकारले आहेत. राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, शिवशाही अशा अनेक राजघराण्यांनी या प्रदेशांवर राज्य केल्याने ऐतिहासिक अंतर्गत नाते निर्माण झाले आहे. विठ्ठलाचे दैवत आणि शिवाजी महाराजांचे मूळ यांसारख्या बाबी दोन्ही संस्कृतींचे समन्वयशील प्रतीक आहेत. दोन्ही भाषा भिन्न भाषिक गटांतील असूनही (कन्नड-द्राविड, मराठी-इंडो-आर्यन) त्यांनी एकमेकांवर प्रभाव टाकला आहे, ज्यामुळे मराठीत अनेक कन्नड शब्द आले आहेत आणि सीमाभागात मिश्र भाषा तयार झाली आहे. सीमावाद राजकीय असला तरी सर्वसामान्य लोक रोटी-बेटी व्यवहार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण मुक्तपणे करतात, ज्यामुळे दोन्ही प्रदेशांमधील सौहार्दपूर्ण संबंध अधिक दृढ होतात.कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाषिक आणि सांस्कृतिक संबंधांचा दीर्घ, जिव्हाळ्याचा आणि गुंतागुंतीचा इतिहास आहे. भाषा वेगवेगळ्या असल्या तरी दोन्ही प्रदेशांतील संस्कृती एक आणि समान आहे, जिथे लोकांनी धर्मनिरपेक्षतेची भावना जपून एकमेकांच्या चालीरीती, कला, साहित्य आणि सण-उत्सव प्रेमाने स्वीकारले आहेत. राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, शिवशाही अशा अनेक राजघराण्यांनी या प्रदेशांवर राज्य केल्याने ऐतिहासिक अंतर्गत नाते निर्माण झाले आहे. विठ्ठलाचे दैवत आणि शिवाजी महाराजांचे मूळ यांसारख्या बाबी दोन्ही संस्कृतींचे समन्वयशील प्रतीक आहेत. दोन्ही भाषा भिन्न भाषिक गटांतील असूनही (कन्नड-द्राविड, मराठी-इंडो-आर्यन) त्यांनी एकमेकांवर प्रभाव टाकला आहे, ज्यामुळे मराठीत अनेक कन्नड शब्द आले आहेत आणि सीमाभागात मिश्र भाषा तयार झाली आहे. सीमावाद राजकीय असला तरी सर्वसामान्य लोक रोटी-बेटी व्यवहार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण मुक्तपणे करतात, ज्यामुळे दोन्ही प्रदेशांमधील सौहार्दपूर्ण संबंध अधिक दृढ होतात.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
बांधव्य (कन्नड) - कन्नड-मराठी, संपा. राजशेखर इंचंगी, कन्नड जागृती पुस्तकमाले, अल्लामाप्रभू जनकल्याण संस्था, चिंचणी, तालुका-चिकोडी.
कन्नड-मराठी सांस्कृतिक बांधव्य - डॉ. विठ्ठलराव गायकवाड, प्रसारंग, कन्नड विद्यापीठ, हंपी.
कन्नड नाडीन चरित्रे - डॉ. एस. सी. नंदीमठ, कन्नड साहित्य परिषद, बेंगळुरू.
The Marathi-Kannada Relationship - Dr. Pandit Awalikar, Prasarang, University of Mysore.
महाराष्ट्र-कर्नाटक सांस्कृतिक अनुबंध, संपा. डॉ. अ. रा. तोरो, प्रतिमा प्रकाशन, पुणे.
बेळगावी भाग्य - संपा. डॉ. बसवराज जगजंपी, डॉ. रामकृष्ण मराठे, शिरीष जोशी, कन्नड साहित्य परिषद जिल्हा घटक, बेळगाव.
मऱ्हाटी संस्कृती: काही समस्या, डॉ. शं. बा. जोशी, व्हीनस प्रकाशन, पुणे.