राणीमाशी: स्त्रीपुरुष संबंधांवर भाष्य

Main Article Content

संजय कांबळे

Abstract

शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या वाङ्मयीन वाटचालीमध्ये तीन आत्मनिवेदनात्मक पुस्तके लिहिली.’अक्करमाशी’ (१९८४), ‘बारामाशी’ (१९८८), ‘राणीमाशी’ (१९९२) यांचा उल्लेख होतो. दाहक जीवनानुभवातून ‘अक्करमाशी’ ची निर्मिती झाली आहे. तर ‘बारामाशी’ या आत्मकथनात लिंबाळे ‘दलित ब्राह्मण’ म्हणून पांढरपेशा मध्यमवर्गीय मनाची कबुली देतात, तर ‘राणीमाशी’ या तिसऱ्या आत्मनिवेदनात्मक पुस्तकात ‘विवाह बाह्य स्त्रीपुरूष संबंधा’चे चित्रण आले आहे.
मराठी साहित्यामध्ये तीन वेगवेगळ्या विषयावरील आत्मकथने लिहिण्याची ही एक अपवादात्मक पध्दत आहे. मात्र शरणकुमार लिंबाळे यांनी अशा वेगवेगळ्या विषयावर ‘आत्मकथने’ लिहून मराठी आत्मकथनामध्ये मोलाची भर टाकली आहे.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

संजय कांबळे

मराठी विभाग, राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगावी, कर्नाटक

How to Cite

संजय कांबळे. (2025). राणीमाशी: स्त्रीपुरुष संबंधांवर भाष्य. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 8(04), 01 to 09. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/1450

References

शरणकुमार लिंबाळे: ‘राणीमाशी’, प्रचार प्रकाशन, कोल्हापूर, पहिली आवृत्ती, जाने. १९९२, मलपृष्ठ.

विजयकुमार खंदारे: ‘शरणकुमार लिंबाळे यांची आत्मकथने एक अभ्यास’, पुणे, विद्यापीठाच्या एम.फिल. पदवीसाठी सादर करण्यात आलेली प्रबंधिका, १९९६, पृ. ७४.

शरणकुमार लिंबाळे: ‘दलित ब्राह्मण’, दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे, तिसरी आवृत्ती, जून, २००७, दत्ता भगत यांनी लिहिलेली प्रस्तावना, पृ. ८.

शरणकुमार लिंबाळे: ‘राणीमाशी’, पृष्ठ संख्या नाही.

श्रीपाल सबनीस: ‘समतोल समीक्षा’, दिलीपराज प्रकाशन, पुणे, जानेवारी, १९९४, पृ. ६२.

शरणकुमार लिंबाळे: ‘राणीमाशी’, मनातलं, पृष्ठसंख्या नाही.

शरणकुमार लिंबाळे: ‘विवाहबाह्य संबंध’, नवीन दृष्टिकोन, दिलीपराज प्रकाशन, पुणे, द्वितीयावृत्ती, १५ जून, २००७, पृ. ५.

शरणकुमार लिंबाळे: तत्रैव, पृ. १०५१०६.

Most read articles by the same author(s)