मराठी साहित्य प्रवाहात ग्रामीण साहित्याची गरज
Main Article Content
Abstract
मराठी साहित्य प्रवाहात ग्रामीण साहित्याची गरज हा महत्त्वाचा घटक आहे. १९६० नंतर उदयास आलेल्या या प्रवाहाची प्रेरणा ‘गाव’ आहे, ज्यात शेती आणि गावकरी जीवन केंद्रस्थानी आहे. ‘पिराजी पाटील’ (१९०३) ही पहिली ग्रामीण कादंबरी आणि बहिणाबाई चौधरी पहिली ग्रामीण कवयित्री मानली जाते. स्वातंत्र्यापूर्वी र.वा. दिघे तर स्वातंत्र्योत्तर गो.नी. दांडेकर, व्यंकटेश माडगुळकर, अण्णाभाऊ साठे यांसारख्या लेखकांनी या साहित्याला समृद्ध केले. ग्रामीण जीवनातील वास्तव, बदलती संस्कृती, कृषी जीवन आणि समूह भावना शहरांतील लोकांना समजावून सांगणे, तसेच ग्रामीण लेखकांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे ही ग्रामीण साहित्याची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. आधुनिकतेमुळे खेड्यांचे स्वरूप बदलले आहे, परंतु ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन आणि साहित्याचा चिरकाळ टिकाव यासाठी साहित्य आणि समाज यात एकसंधता येणे गरजेचे आहे.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
मोहन पाटील - ग्रामीण साहित्य आणि संस्कृती, आवृत्ती पहिली जुलै २००१, प्रकाशिका – सौ. उषा मुळाटे, स्वरूप प्रकाशन
द. ता. भोसले - ग्रामीण साहित्य एक चिंतन, १९८८ प्रकाशक अनिल मेहता
डॉ. आनंद यादव - ग्रामीणता साहित्य आणि वास्तव, प्रथमावृत्ती ६ मे १९८१, प्रकाशक - अनिल मेहता.
डॉ. रवींद्र ठाकर- मराठी ग्रामीण कादंबरी १८८० ते २०००, प्रथमावृत्ती- २५ जानेवारी १९९२, प्रकाशक- श्री. एल. व्ही. तावरे