भारतीय भाषा व साहित्याचा अभ्यास

Main Article Content

सारिका सचिन भोसले

Abstract

आज आपल्या भारतामध्ये साहित्य अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाषांमधून लिहिले जाते. मात्र या लिहिण्याचे स्वरूप आणि जडणघडण हे मात्र एकात्म प्रकारचे आहे. कारण याचा मजबूत पाया आहे आणि तो पाया म्हणजे आपली भारतीय संस्कृती. कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी सन १९१८ मध्ये विश्व‌भारतीचा पाया घातला, त्याचा उद्देश होता ‘वसुधैव कुटुंबकम्’. म्हणजेच भारत वर्षातील शिक्षण पद्धतीने वैदिक, पौराणिक, बौद्ध, जैन, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, पारसी इत्यादी सर्व विचार एकत्र आणले पाहिजेत. त्यानंतर साने गुरुजींच्या आंतरभारतीची संकल्पना निर्माण झाली. भारतीय साहित्यात प्राचीन काळापासून मिथक, चिंतन, मूल्य अशा तिन्ही अंगांनी समांतर अभिव्यक्ती होत आली आणि त्यामधूनच राष्ट्रीयतेचा, एकजुटीचा, एकात्मतेचा विचार पुढे आला. सर्वधर्मसमभाव, समानतेची आणि सहिष्णुतेची वृत्ती विकसित झाली. समाज सुधारणेच्या कामाबरोबरच सामाजिक परिवर्तनाचे कार्यसुद्धा साहित्याने मोठ्या प्रमाणावर केले. भाषा ही समाजातील अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. भाषेच्या स्थित्यंतरावरून समाजाची स्थित्यंतरे लक्षात येतात. आज जागतिकीकरणानंतर आणि माहिती तंत्रज्ञान साधनाच्या विकासयुगात जग जवळ आले आहे. आज या विज्ञान युगात मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आहे. आता त्याची नजर मंगळावर आहे. या प्रचंड ब्रम्हांडात आपल्यासारखाच माणूस कोठे आहे काय, याचा शोध घेत आहे. पण हे सारे करताना आपल्या समोरच्या माणसाला मात्र तो विसरत चालला आहे. त्याने निर्माण केलेल्या कला, भाषा, साहित्याचा विसर पडत आहे, दुर्लक्ष होत आहे. म्हणून आपली संस्कृती आणि भाषा जपणे आपले कर्तव्य आहे.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

सारिका सचिन भोसले

स. ब. खाडे महाविद्यालय, कोपार्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.

How to Cite

सारिका सचिन भोसले. (2026). भारतीय भाषा व साहित्याचा अभ्यास. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 12(02), 242 to 250. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/366

References

केशव मेश्राम - साहित्य संस्कृती मंथन, प्रथमावृत्ती ऑगस्ट २००४, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद.

डॉ. सुनीलकुमार लवटे - भारतीय भाषा व साहित्य, प्रथमावृत्ती २ ऑक्टोबर २०१७, साधना प्रकाशन.

म. सु. पाटील - साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध, प्रथमावृत्ती जुलै २००१, शब्दालय प्रकाशन.

Most read articles by the same author(s)