राष्ट्रीय एकात्मता आणि भाषा धोरणे

Main Article Content

नरसिंग अप्पासाहेब कदम

Abstract

भारत हा बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देश आहे. भारतात भाषावार प्रांतरचना झालेली आहे. भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. विविध धर्म, भाषा, कला, संगीत, नृत्य, सण आणि परंपरा यांचा संगम या संस्कृतीमध्ये झालेला आहे. या संस्कृतीमध्ये विविधतेतून एकतेचे दर्शन घडवले जाते. हे दर्शन धर्म, अध्यात्म, कला आणि चालीरीतीद्वारे घडते. सिंधू संस्कृतीपासून तिचा प्रवास सुरू झालेला आहे. पुढे तो अनेक प्रादेशिक आणि भाषिक वैविध्यांनी समृद्ध झालेला आहे. अशा या विविधतेने नटलेल्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्याचे काम सातत्याने केले जाते. भाषा, धर्म आणि संस्कृती आणि प्रादेशिक पार्श्वभूमीचे लोक एकत्र येऊन आपण एक आहोत याचे अनुभव घेताना दिसतात.
भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता राहायला हवी यावर अनेक अभ्यासकांनी मते मांडली. अनेक समाजसेवकांनी त्यावर कार्य केले. असे करण्याचे कारण म्हणजे एकात्मतेमध्ये सुख, समृद्धी आणि विकास दडलेला आहे. तो कायम राहावा व पुढे त्यात वाढ व्हावी या भूमिकेतून एकात्मता बळावत गेली. राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व त्यांना का वाटले? तर त्याचे कारण म्हणजे त्यामुळे राष्ट्र मजबूत होते. देशाच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी त्याचा प्रभावीपणे वापर केला जातो. त्यामुळे सामाजिक सलोखा राखला जातो. सामाजिक सलोखा व्यवस्थित राखला तर संघर्ष टाळता येतो. राष्ट्र जर एकसंध असेल तर बाह्य धोक्यापासून सुटका मिळते. त्यांच्याशी संघर्ष मोठ्या प्रमाणात होणार नाही. जेव्हा संघर्ष, मतभेद कमी होतात, तेव्हा विकासाची दारे खुली होतात. जेव्हा विकास व्हायला लागतो तेव्हा भारत देश समृद्धशाली बनतो.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

नरसिंग अप्पासाहेब कदम

प्रोफेसर छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, उदगीर जि. लातूर.

How to Cite

नरसिंग अप्पासाहेब कदम. (2026). राष्ट्रीय एकात्मता आणि भाषा धोरणे. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 12(02), 300 to 304. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/372

References

संपादक राजन गवस - मुराळी - मातृभाषा - दिवाळी विशेषांक ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५

संपादक - डिगोळे गंगाधर - नवे शैक्षणिक पर्व, दै. अदिती एक्सप्रेस, दिवाळी विशेषांक २०२५

https://testbook.com

https://prasidhmarathi.blogspot.com