मराठी भाषा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर
Main Article Content
Abstract
भारत हा भाषिक विविधतेचा देश असून येथे शेकडो भाषा व बोली अस्तित्वात आहेत. मात्र जागतिकीकरण, इंग्रजीचे वर्चस्व व तांत्रिक मर्यादांमुळे अनेक भारतीय भाषा मागे पडत आहेत. अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) हे प्रभावी साधन ठरू शकते. या संशोधन पेपरमध्ये भारतीय भाषांच्या प्रचार व संवर्धनासाठी AI तंत्रज्ञानाचा उपयोग, त्याचे स्वरूप, संधी, आव्हाने व भविष्यातील शक्यता यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे.
एकता म्हणजे विविधतेतून निर्माण होणारे एकात्मतेचे भाव. भारतात भाषिक एकता ही परस्पर आदर, सहिष्णुता व स्वीकार यांवर आधारित आहे. विविध भाषा असूनही भारतीय समाजात एकात्मतेची भावना दृढ आहे. AI आधारित भाषांतर प्रणाली, आवाज ओळख, भाषिक डेटाबेस, डिजिटल शिक्षण आणि सोशल मीडियातील वापर यामुळे भारतीय भाषांना नवे व्यासपीठ मिळत आहे, हे या अभ्यासातून स्पष्ट होते.
मराठी ही समृद्ध परंपरा, साहित्य आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली भारतीय भाषा आहे. २१ व्या शतकात माहिती-तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे भाषांचा वापर, जतन आणि प्रसार नव्या स्वरूपात होत आहे. मराठी भाषेचा AI मधील वापर ही काळाची गरज बनली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक प्रणालींना मानवी मेंदूप्रमाणे विचार, निर्णय, भाषा समजून घेणे, शिकणे आणि प्रतिसाद देण्याची क्षमता देणारे तंत्रज्ञान. भारत हा बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देश आहे. भारतीय भाषांचा या संशोधनात सविस्तर ऊहापोह करण्यात आला आहे.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
कुलकर्णी, म. र. - भारतीय भाषा: स्वरूप आणि समस्या, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.
गोडबोले, अच्युत - “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स”, मधुश्री पब्लिकेशन, मुंबई.
डॉ. भूषण केळकर - (लेखक न्यूफ्लेक्स टॅलेंटचे संचालक, AI तज्ज्ञ आणि करिअर काऊन्सिलर आहेत).
फडके, य. दि. - भाषाविज्ञान: सिद्धांत आणि उपयोग, राजहंस प्रकाशन, पुणे.
जोशी, नीलिमा - “मराठी भाषा आणि डिजिटल तंत्रज्ञान”.
देशपांडे, ग. त्र्यं. - भाषा आणि समाज, पॉप्युलर प्रकाशन, पुणे.