ग्रामीण कादंबरीतील संस्कृती दर्शन : एक अभ्यास

Main Article Content

शिवाजी आनंदराव सूर्यवंशी

Abstract

प्रस्तुत शोधनिबंधात मराठी ग्रामीण कादंबरीतील संस्कृती दर्शनाचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. १९६० नंतर ग्रामीण साहित्याचा प्रवाह अधिक प्रबळ झाला असला तरी, त्याची मुळे प्राचीन साहित्यातही आढळतात. भारतीय संस्कृतीचा खऱ्या अर्थाने आत्मा ग्रामीण भागात वसलेला असून ग्रामीण कादंबरीने हे वास्तव प्रभावीपणे मांडले आहे. या निबंधात रा. रं. बोराडे, विश्वास पाटील, उत्तम बंडू तुपे, आणि माधव कोंडविलकर यांच्या कादंबऱ्यांच्या आधारे ग्रामीण समाजजीवन, शेती संस्कृती, प्रथा-परंपरा, अंधश्रद्धा, आणि राजकीय स्थित्यंतरे यांचा आढावा घेतला आहे. ग्रामीण माणूस आणि निसर्ग यांचे नाते, बदलती कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक संघर्षातून होणारे सांस्कृतिक दर्शन हा या अभ्यासाचा मुख्य गाभा आहे.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

शिवाजी आनंदराव सूर्यवंशी

मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड.

How to Cite

शिवाजी आनंदराव सूर्यवंशी. (2026). ग्रामीण कादंबरीतील संस्कृती दर्शन : एक अभ्यास. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 12(01), 165 to 170. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/332

References

गो. म. कुलकर्णी - वाङ्मयेतिहास सद्यस्थिती आणि अपेक्षा - आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास - संपा. गो. म. कुलकर्णी/ दत्तात्रय पुंडे - मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे - १९७५ - पृष्ठ ७१

शिवसांब कापसे - जगदीश कदम यांची कविता - स्वामी प्रकाशन पूर्णा - २००९ - पृष्ठ १७

विश्वास पाटील - पांगिरा - राजहंस प्रकाशन पुणे १९९० - पृष्ठ ८७