भाषांतराचा मराठी साहित्यावरील प्रभाव
Main Article Content
Abstract
प्रस्तुत लेख मराठी साहित्यावर झालेल्या भाषांतराच्या बहुआयामी प्रभावाचा आढावा घेतो. ‘भाषांतर’ ही केवळ शब्दांतराची प्रक्रिया नसून ती दोन संस्कृतींमधील संवादाचा प्रभावी दुवा आहे, हे लेखकाने स्पष्ट केले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’पासून सुरू झालेला हा प्रवास १८००-१८७४ च्या ‘भाषांतर युगा’पर्यंत कसा विस्तारत गेला, याचे विवेचन यात आढळते. मेजर कॅन्डी, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि ड्रायडन यांच्या भाषांतरविषयक सिद्धांतांचा आधार घेत, भाषांतरामुळे मराठीत कादंबरी, सुनीत, गझल आणि हायकू यांसारखे नवे वाङ्मयप्रकार कसे रुजले, यावर प्रकाश टाकला आहे. तसेच भाषांतराची प्रक्रिया, त्यातील आव्हाने, मर्यादा आणि जागतिकीकरणाच्या काळात मराठी साहित्याला लाभलेली जागतिक दृष्टी यांचा चिकित्सक अभ्यास या लेखात मांडला आहे.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती - वसंत आबाजी डहाके
मराठी भाषा - संचित आणि नव्या दिशा - विजय कुवळेकर
तौलनिक साहित्य - निशिकांत मिरजकर
जागतिकीकरण आणि मराठी भाषा - गीता मांजरेकर
तौलनिक साहित्याभ्यास - वसंत बापट